Para Asian Games 2023 : आशियाई पॅरा खेळ स्पर्धा 2023 मध्ये अंकुर धामा याने भारतासाठी सुवर्ण कामगिरी केली आहे. 5000 मीटर पुरुषांच्या धावण्याच्या स्पर्धेत त्यानं सुवर्ण पक पटकावलं आहे. वयाच्या पाचव्या वर्षी डोळ्यांची दृष्टी गेल्यानंतर त्याने हार न मानता धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवत अंकुर धामा याने नाव कमावलं आहे. अंकुर धामा हा उत्तर प्रदेशातील बागपतचा रहिवाशी आहे. अंकुरला लहानपणापासून दृष्टी नाही. डोळ्याने दिसत नसलं तरी अंकुरने उज्ज्वल अशी कामगिरी केली.


चीनमध्ये सुरु असलेल्या एशियन पॅरा गेम्स स्पर्धेत भारताची धडाकेबाज कामगिरी सुरु आहे. पॅरा अ‍ॅथलिट अंकुर धामाने सुवर्णपदक पटकावलं. 5 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत अंकूरने गोल्ड मेडल मिळवलं.


आशियाई पॅरालम्पिक स्पर्धेत भारताचा डंका


चीनच्या हांगझोऊमध्ये 22 ते 28 ऑक्टोबरदरम्यान आशियाई पॅरालम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत धडाकेबाज कामगिरी केली आहे. अंकुर धामाने भारताची ही कामगिरी कायम ठेवली. अंकुरने 5000 मीटर टी11 स्पर्धेत सुवर्णपदाकाची कमाई केली. अंकुरने 5 हजार मीटर अंतर 16:37:29 मिनिटात पूर्ण केलं. अंकुरच्या या कामगिरीनंतर उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळगावी जल्लोष करण्यात आला.






अपघातात गमावली दृष्टी


वयाच्या पाचव्या वर्षी एका अपघातात दृष्टी गेल्यानंतर त्याने खेळालाच जीवनाचा आधार बनवलं आणि देशालाही गौरव मिळवून दिला आहे. अंकुर धामा आशियाई पॅरा गेम्समध्ये पाच हजार मीटर शर्यतीत देशासाठी सुवर्णपदक पटकावलं आहे. वयाच्या पाचव्या वर्षी अंकुर धामाच्या डोळ्यांमध्ये होळीचा रंग गेला होता. कुटुंबीयांनी त्यांच्यावर खूप उपचार केले, पण त्यांची दृष्टी काही परत आली नाही.






पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा


पंतप्रधान मोदी यांनी अंकुर धामा याला शुभेच्छा देत त्याचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्स मीडियावर ट्वीट करत लिहिलं आहे की, पुरुषांच्या 5000 मीटर T11 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकुर धामाचं मनपूर्वक अभिनंदन. त्यांची उल्लेखनीय कामगिरी थक्क करणारी होती आणि त्यामुळे आपल्या देशाला अभिमान वाटत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Asian Para Games 2023 : प्रणव सुरमा आणि शैलेश कुमारची सुवर्ण कामगिरी! आशियाई पॅरा खेळ स्पर्धेत आतापर्यंत नऊ पदकांची कमाई