Haribhau Rathod On Maratha Reservation : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वातावरण तापलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला (Hunger Strike) सुरुवात केली असून दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्युला सापडल्याचा दावा अभ्यासक आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे असून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण मिळणं शक्य असल्याचं वक्तव्य हरिभाऊ राठोड यांनी केलं आहे. 


मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला सापडला


आरक्षण देण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. मराठा समाजाला 50 टक्यांकेच्या आत आरक्षण देणे शक्य आहे, असं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अत्यंत जटील झाला असून, हा लढा अत्यंत तीव्र झाला आहे, हा लढा सरकारला पेलवणार नाही आणि झेपवणार पण नाही, असे वारंवार जरांजे पाटील सांगत आहेत.  मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत ओबीसीमधून संविधानात्मक आणि कायमस्वरूपी टिकणारे असे  आरक्षण मिळावे ही मागणी जोर धरू लागली आहे. हे आरक्षण देणे शक्य आहे, त्याचा फॉर्मुला माझ्याकडे तयार आहे  असे आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं आहे.


'ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणं शक्य'


सरकारला आणि आंदोलकांना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असल्यास त्यांनी मी सुचवलेला फॉर्म्यूल्याचा अभ्यास करावा आणि निर्णय घ्यावा, जेणेकरून मराठा समाजालाही 50 टक्क्यांच्या आत ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता, संविधानात्मक आणि कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणं शक्य होईल, असं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं आहे.


माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावर भाष्य केलंय, देशात रोहिणी आयोग लागू करुन कुणबी मराठ्यांच्या एकत्र टक्केवारीच्या प्रमाणात ओबीसी आरक्षण देता येईल, अशी प्रतिक्रिया राठोड यांनी याआधी दिली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maratha Reservation : मनोज जरांगेच्या लढ्याचा दुसरा अध्याय! आमरण उपोषणाला सुरुवात; आंदोलन उग्र करु नका, मराठ्यांना आवाहन