Pakistan vs South Africa Innings Highlights: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानला 46.4 षटकात 270 धावांमध्ये गुंडाळले. पाकिस्तानकडून सौद शकील आणि कर्णधार बाबर आझम यांनी अर्धशतकी खेळी खेळली. शकीलने 52 तर कर्णधार बाबरने 50 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सीने सर्वाधिक 4 बळी घेतले. पाकिस्तानकडून कॅप्चन बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सौद शकील आणि शादाब खान यांना चांगली सुरुवात मिळूनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 


पाकिस्तानचा डाव सावरलाच नाही 


नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला सुरुवातीपासूनच आपला डाव सांभाळता आला नाही. 5 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अब्दुल्ला शफीकच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली, जो 9 धावा करून बाद झाला. यानंतर सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दुसरा सलामीवीर इमाम उल हक 12 धावा काढून बाद झाला. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यानसेनने दोन्ही पाकिस्तानी सलामीवीरांची शिकार केली. त्यानंतर कर्णधार बाबर आणि फलंदाज रिझवान यांनी काही काळ डाव रोखून धरला आणि तिसर्‍या विकेटसाठी त्यांच्यात 48  धावांची भागीदारी झाली, जी गेराल्ड कोएत्झीने 16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला (31) बाद करून मोडून काढले. 


त्यानंतर पाकिस्तानची चौथी विकेट 25.1 षटकात इफ्तिखार अहमदच्या रूपाने पडली, जो 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कर्णधार बाबर आझम 28व्या षटकात 50 धावांवर फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीचा बळी ठरला. त्यानंतर फलंदाजीसाठी सौद शकील आणि शादाब खान यांनी सहाव्या विकेटसाठी 84 धावांची (71 चेंडू) भागीदारी करून संघाला काहीशी स्थिरता मिळवून दिली. कोएत्झीने 40व्या षटकात शादाब खानला (43) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली आणि पाकिस्तानचा धावगती कमी केली.


त्यानंतर चांगली खेळी खेळत असलेला सौद शकील 43व्या षटकात 52 धावा काढून बाद झाला. यानंतर शाहीन शाह आफ्रिदी 02 धावा करून 10वी विकेट म्हणून बाद झाला, चांगल्या खेळीकडे वाटचाल करणाऱ्या मोहम्मद नवाजने 24 आणि वसीम ज्युनियरने 7 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी अशी राहिली. दक्षिण आफ्रिकेकडून फिरकीपटू तबरेझ शम्सीने सर्वाधिक 4 बळी घेतले. यादरम्यान त्याने 10 षटकात 6 च्या इकॉनॉमीसह 60 धावा दिल्या. याशिवाय मार्को यानसेनने 3 पाकिस्तानी फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कोएत्झीला 2 आणि लुंगी अँडिगीला 1 यश मिळाले.


इतर महत्वाच्या बातम्या