लातूर : अहमदपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचे पडघम आज पासुनच सुरू झाल्याची स्थिती आहे. याचे मुख्य कारण ठरले आहे माजी आमदार विनायकराव पाटील (Vinayakrao Patil) यांनी भाजपाला रामराम केला आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. हा निर्णय स्वत: विनायकराव पाटीलांनी जाहीर केलाय. 29 ऑक्टोबर रोजी ते शदर पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात पक्षप्रवेश करतील. 


राज्याच्या राजकारणात गटबाजीचं राजकारण सुरु झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते आमदार यांनी त्यांची त्यांची भूमिका निवडली. अनेकांनी पक्ष देखील बदलला. तसेच पक्ष बदलण्याचं आमदारांच सत्र अजूनही सुरुच आहे.


का घेतला पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय?


यावेळेस ही गटबाजी संपेल आणि आपली उमेदवारी निश्चित होईल अशी आशा विनायकराव पाटील यांना होती. मात्र जिल्हाध्यक्षपदी त्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेले उमेदवार दिलीपराव देशमुख यांची वर्णी लागली. यामुळे विनायकराव पाटील समर्थक गटामध्ये अस्वस्थता वाढली होती. त्यातच भाजपाचे जिल्ह्यामध्ये अनेक गट तट तयार झाल्याने विनायकराव पाटील यांची भाजपामध्ये घुसमट होत होती. त्यातच सगळे विरोधक हे एकत्र आलेत त्यांच्या विरोधात सक्षमपणे उभे राहिल्यास मतदार आपल्या बाजूने येतील हे लक्षात घेत विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे.


कोण आहेत विनायकराव पाटील?


विनायकराव पाटील हे लातूरच्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळेस आमदार म्हणून निवडून आलेत.राज्यमंत्री पदी त्यांनी काम देखील केलं आहे. गत वेळेस भाजपातील गटबाजीचा फटका त्यांना बसला होता.यात त्यांचा पराभव झाला. भाजपातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून विनायकराव पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर आलं आहे.


पण त्यांचा हा निर्णय अहमदपूरचे राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची चिन्ह सध्या आहेत. गेल्या वेळेस राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले बाबासाहेब पाटील हे अजित पवार गटाचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात आता विनायकराव पाटलांना राष्ट्रवादीत जाऊन दंड थोपटले आहेत. मतदार संघाची रचना विनायकराव पाटलांची कार्यकर्त्याची फळी आणि शरद पवार यांची मदत या त्रिसूत्री संगम करत विनायकराव पाटील यांनी बाबासाहेब पाटील यांना तगडा आव्हान आत्ताच निर्माण केल्याची चिन्ह आहेत.


हेही वाचा : 


Aaditya Thackeray : नाराज युवासैनिकांना खुश करण्यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्नशील, युवासेनेच्या कार्यकारिणीचा विस्तार होणार