Pakistan vs Netherlands : पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत परतला; अर्धशतकवीर मोहम्मद रिजवान, सौद शकील झटपट बाद

Pakistan vs Netherlands : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात आतापर्यंत 6 वनडे सामने झाले आहेत. पाकिस्तानने ते सर्व जिंकले आहेत.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 06 Oct 2023 05:15 PM
पाकिस्तानची धावसंख्या अडीचशे पार, नेदरलँडने दिला सातवा झटका

Pakistan vs Netherlands, 2nd Match - Live Cricket Score : नेदरलँडने जम बसलेल्या रिजवान आणि सौदला बाद करत तीन झटके देत सामन्यांमध्ये रंगत निर्माण केल्यानंतर मोहम्मद नवाज आणि शादाब खान यांनी सातव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी करत पाकिस्तानला अडीचशे टप्पा पार करून दिला आहे. शादाब खान 32 धावांवर बाद झाला.  

दुबळ्या नेदरलँडविरोधात पाकिस्तानची पडझड सुरुच; सहा गडी तंबूत परतले

सुरुवातीला पडझड झाल्यानंतर मधल्या फळीतील मोहम्मद रिजवान आणि सौद शकीलने केलेल्या 138 धावांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानला सुस्थितीत नेले होते. मात्र, पुन्हा एकदा पाकिस्तानची घसरगुंडी उडाली आहे. सौद शकील बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर आलेला इफ्तिकारही अवघ्या नऊ धावांवर बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था 33 षटकात 6 बाद 192 अशी झाली आहे. 

पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत परतला; अर्धशतकवीर मोहम्मद रिजवान, सौद शकील झटपट बाद

Pakistan vs Netherlands, 2nd Match - Live Cricket Score :  पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. जम बसलेला मोहम्मद रिजवान आणि सौद शकील माघारी परतले आहेत. दोघांनी पाचव्या विकेसाठी केलेल्या 120 धावांच्या भागीदारीमुळे पाकिस्तान चांगली धावसंख्या उभारणार असे वाटत असताना नेदरलँडने पुन्हा एकदा सामन्यांमध्ये रंगत आणत दोन्ही जमलेल्या खेळाडूंना तंबूत पाठवलं आहे. 

मोहम्मद रिझवान, सौद शकीलने पाकिस्तानचा डाव सावरला

Pakistan vs Netherlands, 2nd Match - Live Cricket Score : अवघ्या नऊ शतकात तीन बाद 38 अशी अवस्था झालेल्या पाकिस्तानला मोहम्मद रिजवान आणि शकील यांच्या भागीदारीन सावरलं आहे. चौथ्या विकेटसाठी त्यांनी केलेल्या भागीदारीने पाकिस्तानचा डाव शंभरी पार गेला आहे. पाकिस्तानच्या 20 षटकात तीन बाद 101 धावा झाला आहेत. शकील 28 जनावर खेळत आहे. पाकिस्तानची 9 षटकांमध्ये तीन बाद 38 अशी अवस्था झाली होती. पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर अपयशी ठरल्यानंतर कर्णधार बाबर आझमही स्वस्तात परतल्याने पाकिस्तान अडचणीत आला होता. मात्र,  मोहम्मद रिझवान आणि शकीलने केलेल्या भागीदारीने पाकिस्तानच्या डावाला आकार आला आहे. 

पाकिस्तानला तिसरा हादरा, नेदरलँडचा भेदक मारा

Pakistan vs Netherlands, 2nd Match - Live Cricket Score : दहा षटकांमध्ये पाकिस्तानला नेदरलँडच्या गोलंदाजांनी चांगलेच हादरे दिले आहेत. दोन्ही सलामीवीरांसह तीन फलंदाज तंबूत धाडस सामन्यावरती चांगलीच पकड मिळवली आहे. अवघ्या 9.4 षटकात पाकिस्तानची अवस्था तीन बाद 42 अशी झाली आहे. सलामीवीर फकर जमान 12 धावांवर बाद झाला. इमाम हक 15 धावांवर बाद झाला, तर कर्णधार बाबर आझम अवघ्या पाच जणांवर तंबूत परतला. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था नाजूक झाली आहे. नेदरलँडच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानचे फलंदाज अडखळताना दिसत आहेत. सध्या मैदानात मोहम्मद रिझवान आणि शकील आहेत

दुबळ्या नेदरलँडविरोधातही बाबर आझम सपशेल अपयशी, पाकिस्तानला दुसरा धक्का

Pakistan vs Netherlands, 2nd Match - Live Cricket Score : नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी झालेल्या पाकिस्तानची पहिल्या दहा ओव्हरमध्येच नेदरलँडने दोन हादरके दिले आहेत. नऊ षटकांमध्ये 38 धावा देत पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना माघारी धाडण्याचे काम नेदरलँडच्या गोलंदाजांनी केलं आहे. सलामीवीर फकर जमान अवघ्या 12 धावांवर बाद झाला, तर कर्णधार बाबरही 5 धावांवर परतला. बाबर आझमने मोठ्या धावसंख्येचा निर्धार बोलून दाखवला होता. मात्र, अवघ्या दहा षटकांमध्ये त्यांचे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत.


 

नेदरलँडने टॉस जिंकून प्रथम पाकिस्तानला फलंदाजी दिली

Pakistan vs Netherlands, 2nd Match - Live Cricket Score :आयसीसी वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्याला प्रारंभ झाला आहे. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानची लढत तुलनेत कमकुवत असलेल्या नेदरलँडविरुद्ध होत आहे. नेदरलँडने टॉस जिंकून प्रथम पाकिस्तानला फलंदाजी दिली आहे. पाकिस्तानच्या फलंदाजी सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने या सामन्यात 300 वर टार्गेट ठेवलं असल्याचं कॅप्टन बाबर आझम म्हणाला. पाकिस्तानकडून सलामीवीर फकर जमान आणि इमाम उल हक मैदानात आहेत. 

पार्श्वभूमी

हैदराबाद  : वर्ल्डकपच्या सलामीच्या लढतीत न्यूझीलंडने इंग्लंडला नमवल्यानंतर आज (6 ऑक्टोबर) पाकिस्तानची लढत नेदरलँडशी (Pakistan vs Netherlands) होत आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात आतापर्यंत 6 वनडे सामने झाले आहेत. पाकिस्तानने ते सर्व जिंकले आहेत. पाकिस्तानची बाजू उजवी असली नेदरलँड पारडे पलटवण्यात सक्षम आहे. 


21 ऑगस्ट 2022 रोजी, नेदरलँड्सच्या पाकिस्तान दौर्‍यादरम्यान थरारक लढत झाली होती. विक्रमजीत सिंग आणि टॉम कूपर यांनी प्रत्येकी अर्धशतक झळकावून सामना अंतिम षटकापर्यंत नेला होता. अखेरीस, ते फक्त 9 धावांनी कमी पडले. नसीम शाह आणि मोहम्मद वसीम यांनी या सामन्यात अनुक्रमे 5 आणि 4 विकेट घेतल्या.


राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी सीम बॉलर्सना उपयुक्त असेलच, पण फलंदाजांसाठी सुद्धा फायदेशीर ठरेल. या ठिकाणीही खेळपट्टीसाठी लाल माती, काळी माती आणि या दोन्हींचे मिश्रण वापरले जाते. पाकिस्तानला पहिल्याच सामन्यापासून आपले लक्ष्य स्पष्ट करायचे आहे. जो त्यांच्यासाठी सर्वात सोपा ठरण्याची शक्यता आहे. श्रीलंका, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील सामने होणार असल्याने पाकिस्तानला पहिले गुण मिळतील याची खात्री करावी लागेल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.