Neeraj Chopra Video: डायमंड लीग स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला (Neeraj Chopra) दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे सराव सत्रादरम्यान डाव्या हाताला झालेल्या दुखापतीनंतरही नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत सहभाग घेतला.
ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने पहिल्याच प्रयत्नात 87.87 मीटरची फेक करत मिळवलेली आघाडी कायम राखली. नीरज चोप्राने (Neeraj Chopra) तिसऱ्या प्रयत्नात 87.86 मीटरची फेक करत दुसरे स्थान मिळवले. यानंतर मात्र त्याला याहून सर्वोत्तम फेक करता आली नाही. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 85.97 मीटरसह तिसरे स्थान पटकावले. नीरजच्या या विजयानंतर एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये नीरजसोबत फोटो काढण्यासाठी युरोपमधील काही तरुणी खूप उत्साही होत्या. यावेळी नीरज चोप्राने देखील चाहत्यांना नाराज केले नाही. त्याने सर्वांसोबत सेल्फी काढला.
नेमकं काय घडलं?
व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की नीरज प्रथम युरोपियन तरुणींना ऑटोग्राफ देतो. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या तरुणी एक-एक करून नीरजसोबत सेल्फी घेतात. सेल्फी घेत असताना, मुली नीरजशी बोलतात, ज्यामध्ये एक तरुणी नीरजा मोबाईल नंबर विचारू लागते.
एका सेंटीमीटरने सुवर्णपदक हुकले-
ग्रेनेडाचा भालाफेकपटू अँडरसन पीटर्सने डायमंड लीग 2024 च्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावले. पीटर्सने 87.87 मीटरच्या सर्वोत्कृष्ट थ्रोसह विजेतेपद पटकावले, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या नीरज चोप्राने 87.86 मीटरची सर्वोत्तम थ्रो केली. अशाप्रकारे, नीरज डायमंड लीगचे विजेतेपद जिंकण्यापासून फक्त 1 सेमी कमी होता. नीरज चोप्रा कदाचित 2024 मध्ये डायमंड लीग चॅम्पियन बनला नाही, परंतु दोन वर्षांपूर्वी हे विजेतेपद जिंकण्यात तो यशस्वी ठरला होता. त्या वर्षी नीरजने अंतिम फेरीत 88.44 मीटर भालाफेक करून डायमंड लीग चॅम्पियन बनण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला होता. 2023 मध्ये नीरज 83.80 मीटर भाला फेकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
डायमंड लीग 2024 अंतिम स्कोअर-
- पीटर्स अँडरसन - 87.87 मीटर
- नीरज चोप्रा - 87.86 मीटर
- वेबर ज्युलियन - 85.97 मीटर
- मार्डे एंड्रियन - 82.79 मीटर
- डीन रॉडरिक गेन्की - 79.78 मीटर
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकले रौप्यपदक-
गेल्या महिन्यात पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोप्राने 89.45 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले होते. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर विक्रमी थ्रो करून सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी अँडरसनला तिसऱ्या स्थानावर होता.