एक्स्प्लोर

Pakistan vs South Africa : दक्षिण आफ्रिकेकडून पाकिस्तानचं 'ऑपरेशन ऑल आऊट' नक्की; अंपायर काॅलने तोंडातला घास हिरावला!

पाकिस्तानने दिलेल्या 270 धावांचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेनं सहज पार केला. टाॅप ऑर्डर स्वस्तात बाद झाल्यानंतर एडन मारक्रमने खेळपट्टीवर नांगर टाकत संघाचा विजय निश्चित केला.

चेन्नई : चेन्नईतील चेपाॅक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचं वर्ल्डकप स्पर्धेतून ऑपरेशन ऑल आऊट नक्की केलं आहे. मधल्या फळीतील एडन मारक्रमच्या झुंजार 91 धावांच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा पराभव केला. या विजयासह दक्षिण गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे. पाकिस्तानने दिलेल्या 270 धावांचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेनं सहज पार केला. टाॅप ऑर्डर स्वस्तात बाद झाल्यानंतर एडन मारक्रमने खेळपट्टीवर नांगर टाकत संघाचा विजय निश्चित केला. त्याने 91 धावांची खेळी केली. त्याला उसमा मीरने विजयासाठी 21 धावांची गरज असताना बाद करत रंगत निर्माण केली, पण तबरेज शमसी आणि केशव महाराजने विजय निश्चित केला. 

आफ्रिकेनं एकवेळ 33 षटकांत 4 बाद 206 अशी मजल मारली होती, त्यावेळी विजय निश्चित वाटत होता. मात्र, पाकिस्तानने जोरदार कमबॅक करत सामन्यात रंगत निर्माण केली. मारक्रम मैदानात तोपर्यंत आफ्रिकेचा विजय निश्चित समजला जात होता, पण मोहम्मद वासिम ज्युनिअरने त्याला बाद करत पाकिस्तानला सामन्यात परत आणले. 46 व्या षटकांतील शेवटच्या चेंडूवर शमसी एलबीडब्लू झाला होता, पण रिव्ह्यू आफ्रिकेच्या बाजूनं गेल्याने पाकिस्तानला धक्का बसला आणि हाच सामन्याचा टर्निंग पाँईट झाला. 

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला सुरुवातीपासूनच आपला डाव सांभाळता आला नाही. 5 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अब्दुल्ला शफीकच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली, जो 9 धावा करून बाद झाला. यानंतर सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दुसरा सलामीवीर इमाम उल हक 12 धावा काढून बाद झाला. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यानसेनने दोन्ही पाकिस्तानी सलामीवीरांची शिकार केली. त्यानंतर कर्णधार बाबर आणि फलंदाज रिझवान यांनी काही काळ डाव रोखून धरला आणि तिसर्‍या विकेटसाठी त्यांच्यात 48  धावांची भागीदारी झाली, जी गेराल्ड कोएत्झीने 16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला (31) बाद करून मोडून काढले. 

त्यानंतर पाकिस्तानची चौथी विकेट 25.1 षटकात इफ्तिखार अहमदच्या रूपाने पडली, जो 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कर्णधार बाबर आझम 28व्या षटकात 50 धावांवर फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीचा बळी ठरला. त्यानंतर फलंदाजीसाठी सौद शकील आणि शादाब खान यांनी सहाव्या विकेटसाठी 84 धावांची (71 चेंडू) भागीदारी करून संघाला काहीशी स्थिरता मिळवून दिली. कोएत्झीने 40व्या षटकात शादाब खानला (43) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली आणि पाकिस्तानचा धावगती कमी केली.

त्यानंतर चांगली खेळी खेळत असलेला सौद शकील 43व्या षटकात 52 धावा काढून बाद झाला. यानंतर शाहीन शाह आफ्रिदी 02 धावा करून 10वी विकेट म्हणून बाद झाला, चांगल्या खेळीकडे वाटचाल करणाऱ्या मोहम्मद नवाजने 24 आणि वसीम ज्युनियरने 7 धावा केल्या.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget