Australia Vs Pakistan : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 360 धावांनी लाजिरवाणा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 487 धावा केल्या होत्या, तर पाकिस्तानला पहिल्या डावात 271 धावाच करता आल्या होत्या. कांगारू संघाने पाहुण्या संघाला फॉलोऑनची संधी दिली नाही आणि स्वतः फलंदाजी करून दुसऱ्या डावात 233/5d वर डाव घोषित करून 450 धावांचे लक्ष्य दिले. सामन्याचा हा चौथा दिवस होता आणि दीड सत्रात पाकिस्तान संघाचा पराभव झाला. दुसऱ्या डावात केवळ 89 धावा करता आल्या. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडने दुसऱ्या डावात 3-3 बळी घेतले.






कांगारू संघाकडून या सामन्यात 90 आणि नाबाद 63 धावांची खेळी खेळणाऱ्या मिचेल मार्शला सामनावीर घोषित करण्यात आले. या अष्टपैलू खेळाडूने येथे एक विकेटही आपल्या नावावर केली. पाकिस्तानसाठी फलंदाजी खूपच निराशाजनक झाली. इमाम उल हकने पहिल्या डावात 62 धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात त्याला केवळ 10 धावा करता आल्या. मालिकेतील दुसरी कसोटी 26 डिसेंबर रोजी मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी खेळली जाईल.


जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये प्रथम स्थान गमावले 


चार दिवसांत पहिली कसोटी गमावल्याने, पाकिस्तानने आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 मध्ये पहिल्या क्रमांकाची मालकी सुद्धा गमावली आहे. पर्थ कसोटी सुरू होण्यापूर्वी त्यांच्याकडे 100 PCT (टक्केवारी) होते, परंतु पराभवामुळे पोकिस्तान आता 66.67 PCT वर घसरले आहे. पाकिस्तान आता जागतिक क्रमवारीत प्रथमकावर कट्टर प्रतिस्पर्धी भारतासह गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. या महिन्याच्या सुरुवातीला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलेले न्यूझीलंड आणि बांगलादेश अनुक्रमे 50 पीसीटी (टक्केवारीत) सह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत आणि ऑस्ट्रेलिया 41.67 पीसीटीसह ( टक्केवारीत) पाचव्या स्थानावर आहे.






ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे गतविजेते आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी अंतिम फेरीत भारताचा पराभव करून 2023 ची अंतिम फेरी जिंकली होती. लंडनमधील ओव्हल येथे 7 ते 11 जून दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑसीजने 209 धावांनी विजय मिळवला. अंतिम फेरीतील पराभव हा WTC फायनलमधील भारताचा सलग दुसरा पराभव होता. 2021 च्या फायनलमध्येही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्या प्रसंगी विरोधी संघ न्यूझीलंड होता.


इतर महत्वाच्या बातम्या