MIvsDC, IPL 2020 Final: इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात दिल्ली कॅपिटल आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यासह या मोसमातील ऑरेंज कॅप होल्डर आणि पर्पल कॅप होल्डरचा निर्णयही आज होईल. किंग्ज इलेव्हन पंजाबचा केएल राहुल अंतिम सामन्यापर्यंत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पुढे आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा कसिगो रबाडाने पर्पल कॅपवरील आपला दावा कायम ठेवला आहे.


मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागे सारून रबाडाने पर्पल कॅपवर कब्जा मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाने रविवारी आयपीएल -13 च्या क्वालिफायर -2 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 29 धावा देऊन चार बळी घेतले. यासह रबाडेने आतापर्यंत 16 सामन्यांत 29 विकेट्स घेतल्या आहेत.


जसप्रीय बुमराह 14 सामन्यांत 27 विकेट्स घेऊन सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बाउल्ट 14 सामन्यांत 22 विकेट्स घेत तिसर्‍या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला अधिक विकेट घेऊन पर्पल कॅप आपल्या नावे करण्याची संधी असणार आहे.


केएल राहुल ऑरेंज कॅपचा दावेदार


फलंदाजांच्या यादीत पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल या मोसमातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सुरुवातीपासूनच अव्वल स्थानी आहे. त्यामुळे ऑरेंज कॅप त्याच्याकडेच आहे. राहुलच्या नावावर 670 धावा आहेत. दुसर्‍या क्रमांकावर अंतिम फेरी गाठणारा दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन आहे. शिखर धवनने 603 धावा केल्या आहेत. धवनला मुंबई इंडियन्स विरुद्ध अंतिम सामन्यात राहुलला मागे टाकण्याची संधी असेल. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर 16 सामन्यांत 548 धावाांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.


दिल्लीविरुद्ध मुंबईचं पारडं जड


आयपीएलच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये 27 वेळा लढती झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाने 27 सामन्यांपैकी 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 12 वेळा दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :