Tokyo Olympics 2020 LIVE : भारताचा पैलवान बजरंग पूनियानं रोमांचक विजय मिळवला आहे. बजरंगनं किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमातालिवेला हरवत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. या प्री क्वार्टर फायनल सामन्यात विजय मिळवत बजरंग क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे.  किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमातालिवे विरुद्धचा हा सामना फारच रोमांचक झाला. या कुस्तीत दोघांनी 3-3 अशी बरोबरी केली मात्र त्याआधी बजरंग पूनियानं दोन प्वाईंट घेतले होते. त्यामुळं त्याला विजयी घोषित करण्यात आलं. जर बजरंगनं पुढचे दोन सामने जिंकले तर भारताचं आणखी एक पदक निश्चित होईल. 


Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव, ग्रेट ब्रिटनचा 4-3 नं मिळवला विजय


कुस्तीपटू सीमा बिसलाचं आव्हान संपुष्टात



भारताची कुस्तीपटू सीमा बिसलाचं टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. प्री क्वार्टर फायनलमध्ये हरल्यानंतरही सीमा बिसला कांस्य पदकाच्या शर्यतीत होती. मात्र ज्या रेसलरनं सीमाला हरवलं होतं ती रेसलर फायनलपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळं सीमा बिसलाचं आव्हान देखील संपुष्टात आलं. कुस्तीत आता बजरंगकडूनच पदकाची अपेक्षा भारताला आहे.


Tokyo Olympics Women's Hockey: पोरी हरल्या पण मनं जिंकली... भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्यपदक हुकलं, ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव



भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव


भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव झाला.  इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय महिला संघानं कांस्य पदकासाठीच्या या लढतीत शानदार कामगिरी केली मात्र एका गोलच्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय पुरुष हॉकी संघानं 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरल्यानंतर आज महिला संघाकडून महिला हॉकीतील पहिल्या पदकाची अपेक्षा होती. भारताच्या लेकींनी या सामन्यात यासाठी पुरेपूर प्रयत्न केले मात्र ते अपुरे पडले.