Messi Leaves Barcelona : दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेस्सी आणि बार्सिलोना क्लब यांचा प्रवास आता संपला आहे. तब्बल 21 वर्षांनी मेस्सीनं बार्सिलोनाची साथ सोडली. एफसी बार्सिलोनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. बार्सिलोना स्पष्ट सांगितलं आहे की, आता लियोनेल मेस्सी बार्सिलोनासोबत खेळणार नाही. 


दरम्यान, मेस्सी वयाच्या सोळाव्या वर्षापासून बार्सिलोनासोबत जोडला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेस्सीचं बार्सिलोनासोबत असलेला करार 30 जून रोजी संपला. त्यानंतर आता मेस्सी दुसरा कोणताही क्लब जॉईन करु शकतो. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून मेस्सी बार्सिलोनासोबत आपला प्रवास सुरु ठेवणार असल्याचं बोललं जात होतं. पण, आता यासर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून आता मेस्सी बार्सिलोनाची साथ सोडली असल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. अशातच चॅम्पिअन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बायर्न म्युनिचकडून 2-8 असा पराभव झाल्यानंतर मेस्सीनं हा निर्णय घेतल्याचं समोर आलं होतं. मात्र त्यावेळी अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. आता स्वतः बार्सिलोना क्लबकडून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. 



बार्सिलोनाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या अधिकृत वक्तव्यात म्हटलं आहे की, दोन्ही पक्षांचे प्रयत्न आणि संमती असूनही, आर्थिक परिस्थितीमुळे हा करार पुढे जाऊ शकला नाही. आणि दोघांचा हा प्रवास संपला. पुढे बोलताना म्हटलं की, मेस्सीचा आमच्यासोबतचा करार संपला असून मेस्सी आता कोणताही क्लब जॉईन करु शकतो. 


बार्सिलोनानं मेस्सीच्या 21 वर्षांच्या सोबतीसाठी आणि योगदानासाठी त्याचे आभार मानले आहेत. तसेच भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. गेल्या आठवड्यात स्पॅनिश फुटबॉल लीगचे प्रेसिडेंट जेवियर टेबस म्हणाले होते की, बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या डोक्यावर सध्या 1.18 बिलियन डॉलर्सचं कर्ज आहे. भारतीय चलनाप्रमाणे, जवळपास 8 हजार कोटींहून अधिक कर्ज क्लबवर आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :