Tokyo Olympics 14th day schedule : टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाच ऑगस्ट म्हणजेच, गुरवारचा दिवस भारतासाठी खास ठरला. सकाळी सर्वात आधी भारतीय पुरुष हॉकी संघानं 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरलं. त्यानंतर संध्याकाळी पहिलवान रवि दाहियानं रौप्य पदकावर नाव कोरलं. याव्यतिरिक्त गोल्फमध्येही भारतासाठी दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 23 वर्षांची गोल्फर अदिती अशोक दुसऱ्या फेरीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अदितीकडून पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. याव्यतिरिक्त बजरंग पुनियाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. हे दोघंही शुक्रवारी म्हमजेच, 6 ऑगस्टला अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. याव्यतिरिक्त भारतीय महिला हॉकी संघ शुक्रवारी कांस्य पदकासाठी मैदानात उतरणार आहेत. जाणून घेऊया भारतीय वेळेनुसार, टोकियो ऑलिम्पिकमधील 14व्या दिवसाचं भारताचं शेड्यूल... 


भारतीय महिला हॉकी संघ ब्रिटनच्या विरोधात सकाळी सात वाजता कांस्य पदकासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाप्रमाणेच महिला हॉकी संघाकडूनही भारताला पदकाची आशा आहे. तसेच कुस्तीमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 65 किलोग्राम स्पर्धेत किर्गिस्तानच्या अरनाजर अकमातालिवच्या विरोधात बजरंग पुनिया मैदानात उतरणार आहे. 


अॅथलेटिक्स : 


गुरप्रीत सिंह, पुरुषांच्या 50 किमी पायी चालण्याच्या स्पर्धा, रात्री दोन वाजता. प्रियंका गोस्वामी आणि भावना जाट, महिलांची 20 किमी पायी चालण्याची स्पर्धा दुपारी एक वाजता. पुरुषांची चौपट 400 मीटर रिले पहिला टप्पा, दुसरी हीट, संध्याकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी. 


गोल्फ : 


अदिति अशोक आणि दीक्षा डागर महिलासाठीच्या वैयक्तिक स्ट्रोक प्ले राउंड तीन, सकाळी चार वाजता. 


हॉकी :


भारत विरुद्ध ब्रिटन, महिला कांस्य पदक सामना, सकाळी सात वाजता. 


कुस्ती :


बजरंग पुनिया विरुद्ध अरनाजर अकमातालिव (किर्गिस्तान), पुरुषांच्या फ्रीस्टाइल 65 किग्रॅ; सकाळी आठ वाजता सुरु झाल्यानंतर आठवा सामना, सीमा बिस्ला बनाम सर्रा हमदी (ट्यूनिशिया), महिलांची फ्रिस्टाइल 50 किग्रॅची रेपेचेज फेरी, सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झाल्यानंतर दुसरा सामना.