Vinesh Phogat: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आज पॅरिसहून मायदेशी परतली आहे. आज सकाळी विनेश फोगाट दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली. यावेळी विनेश फोगाटचे जोरदार स्वागत करण्यात आले. विनेश फोगाटच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक देखील विनेश फोगाटच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर उभे होते. 


विनेश फोगाटला (Vinesh Phogat) रौप्य किंवा सुवर्णपदक मिळाले नसले, पण सीएएसमधील सुनावणीदरम्यान संपूर्ण देश तिच्या पाठीशी उभा राहिला आणि त्याच मोठ्या उत्साहात तिचे स्वागत देखील करण्यात आले. विनेशचे विमानतळावर कोणत्याही सुवर्णपदक जिंकल्याप्रमाणेच स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी आलेल्या साक्षी मलिक आणि बजरंग पुनियाला कडाडून मिठी मारत विनेश फोगाट भावूक झाली. 






विनेश फोगाटच्या डोळ्यात अश्रू- Vinesh Phogat receives a warm welcome at Delhi


विनेश फोगट विमानतळावर पोहोचल्यावर देशवासीयांचे प्रेम पाहून ती भावूक झाली. विनेश फोगाटच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. विनेश फोगट संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे. ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. दुर्दैवाने, अंतिम सामन्यापूर्वी, विनेशचे वजन निर्धारित मानकांपेक्षा 100 ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले, ज्यामुळे त्याला अपात्र घोषित करावे लागले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हे प्रकरण CAS पर्यंत पोहोचल्यावर रौप्य पदक देण्याचे विनेशचे अपील फेटाळण्यात आले.






गावात भव्य स्वागताची जय्यत तयारी-


विनेश परतण्यापूर्वी तिचा भाऊ हरिंदर सिंग याने मीडियाशी बोलताना सांगितले होते, कुस्ती आणि हा खेळ आवडणारे सर्व लोक विनेशचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी आले आहेत. प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक विनेशचे स्वागत करण्यासाठी आले होते. गावात विनेशच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.


विनेश फोगाटने काही शेअर केलं भावूक पत्र-


विनेश फोगाटनं लहान खेड्यातील मुलगी असल्यानं ऑलिम्पिक काय असतं हे माहिती नव्हतं. लहान मुलगी असताना लांब केस असावेत असं स्वप्न असतं. मोठं झाल्यानंतर प्रत्येक तरुणीचं हातात मोबाईल असणं याशिवाय इतर गोष्टी करणं असं स्वप्न असतं. माझे वडील बस चालक होते, ते म्हणायचे, माझ्या मुलीनं विमानातून प्रवास करावा त्यावेळी मी रस्त्यावर गाडी चालवत असावं. माझ्या वडिलांचं स्वप्न मी सत्यात उतरवलं. सर्वात लहान असल्यानं वडिलांची लाडकी होते, असं विनेशनं म्हटलं. आईनं तिच्या मुलींनी तिनं जे आयुष्य जगलं त्याच्या पेक्षा चांगलं आयुष्य जगण्यासाठी संघर्ष केला, असंही विनेश म्हणाली. वडिलांच्या निधनानंतर तीन महिन्यातच आईला कॅन्सर झाल्याचा उल्लेख विनेशनं केला आहे.आईनं केलेला संघर्ष, कधीच हार मानायची नाही ही वृत्ती, लढाऊ बाणा यामुळं मी घडले, असं ती म्हणाली. जे तुझं असेल त्यासाठी संघर्ष करं हे आईनं शिकवलं. जेव्हा धाडस करायचं असतं तेव्हा आईच्या धाडसीपणाचा विचार करते, असं विनेश फोगाटनं म्हटलं. 


संबंधित बातमी:


'देव तुला सुद्धबुद्धी देवो...'; विनेश फोगाटच्या पत्रावरुन वाद, बहीण गीता फोगाटने साधला निशाणा