नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम वजन जास्त झाल्याने अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरलेली स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटबाबत (Vinesh Phogat ) हरियाणात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विनेश फोगाटचे हरियानात भव्य स्वागत करण्यात येणार असून खाप पंचायतीकडून तिला एका समारंभात सुवर्णपदक देऊन गौरवण्यात येणार आहे. हरियानातील खाप पंचायतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  


100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे विनेश अपात्र 


विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार सुरुवात केली होती. विनेश फोगाटने चार वेळा विश्वविजेती आणि गेल्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूचा पराभव केला होता. विनेशने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतही दमदार विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.


विनेश फोगाटची कामगिरी पाहता ती सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र फायनल कुस्तीच्या दिवशी 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं. महिलांच्या 50 किलो वजनी कुस्ती स्पर्धेत विनेश सुवर्णपदक जिंकणार हे निश्चित मानले जात होते. मात्र, 100 ग्रॅम अतिरिक्त वजनाने तिच्या आणि सगळ्या भारतीयांच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं. 


विनेशच्या पदकाचा निर्णय CAS घेणार


विनेश फोगाटने अपात्रतेच्या निर्णयाला विरोध दर्शवत रौप्य पदकाची मागणी केली आहे. तिने सीएएसकडे अपील केलं आहे. या प्रकरणाचा निर्णय लवकरच येणार आहे. सीएएसने विनेशकडून तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. विनेश ई-मेलवर उत्तर देईल. त्यानंतर CAS आपला निर्णय देईल. 


पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत एकूण 6 पदके जिंकली आहेत. त्यामध्ये 5 कांस्य आणि 1 रौप्य पदक आहे. विनेशला रौप्यपदक मिळाल्यास पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची एकूण सात पदके होतील.


विनेशला तीन प्रश्न विचारले


सीएएसने विनेशला ई-मेलद्वारे तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. यातील पहिला प्रश्न, तुला दुसऱ्या दिवशीही वजन करावे लागेल या नियमाची जाणीव होती का? दुसरा प्रश्न रौप्य पदकाशी संबंधित आहे. विनेशला विचारण्यात आले आहे की, क्यूबन कुस्तीपटू तुमच्यासोबत रौप्य पदक शेअर करेल का? आणि तुम्हाला या अपीलचा निर्णय सार्वजनिकपणे जाहीर करायचा आहे की गोपनीय पद्धतीने तो जाहीर करायचा आहे?, असा सवाल विनेशला विचारण्याली माहिती समोर येत आहे.


ही बातमी वाचा: