Coco- cola Sponsership controversy: भारतात लहानांसह तरुणांचं आवडतं पेय कोका -कोला (coco-cola) जगभरातील क्रीडा स्पर्धांमधून बॅन होणार आहे का? जगभरात सध्या 'किक बिग सोडा आऊट ऑफ स्पोर्ट्स' अशी एक नवीन मोहीम राबवली जात आहे. या चळवळीतून सध्या ऑलम्पिकमधून कोका कोला कंपनीचं प्रायोजक म्हणून असलेलं नाव काढून टाकण्यात यावं, अशी मागणी होत आहे. एकीकडे जागतिक आरोग्य संघटनेनं ऑलम्पिकमधील खेळाडूंच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत केलं असताना या स्पर्धांमध्ये कोका कोलाच्या झळकणाऱ्या जाहिरातींसह खेळाडूंसह सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांवर आक्षेप घेण्यात आला आहे. जवळपास १०० वर्षांपासून ऑलम्पिकमध्ये प्रायोजक म्हणून झळकणारी कोकाकोला कंपनीला प्रायोजक म्हणून हटवण्याच्या मागणीचा जोर वाढू लागला आहे. ऑलम्पिकच्या खेळांमध्ये अनेक दशकांपासून प्रायोजक असणारी कोका कोला कंपनीला क्रीडा स्पर्धांमधील स्पॉन्सरशिपमधून हाकलपट्टी होते का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.


कोका कोला ऑलम्पिकचा प्रवास कसा?


कोका कोला ही कंपनी अनेक दशकांपासून आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती (IOC) ची प्रायोजक म्हणून काम करते. १९२८ पासून ऑलम्पिकच्या प्रत्येक यजमान शहरात स्पर्धा टिकवत ही कंपनीचं प्रायोजकत्व चाललं आहे. २०१९ मध्ये या कंपनीचा ऑलम्पिकशी करार संपल्यानंतर ही भागिदारी आणखी १२ वर्षांकरिता वाढविण्यात आली होती. आता जगभरातील आग्रगण्य जागतिक आरोग्य संस्था कोका कोला या कंपनीचं ऑलम्पिक खेळांमध्ये असणारं प्रमुख प्रायोजकत्व काढून टाकण्याची मागणी करत आहेत. 


नक्की का होतेय ही मागणी?


ऑलम्पिकसारख्या खेळात सोडायुक्त पदार्थांच्या वाढत्या विरोधाला आता बळ मिळाले असून क्रीडापटू स्वत:च या कंपन्यांना क्रीडा स्पर्धेत प्रायोजित करण्याच्या परवानगीच्या विरोधात बोलू लागले आहेत. २०२० मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो याने एका पत्रकार परिषदेत त्याच्यासमोर ठेवलेल्या कोका कोलाच्या बाटल्या काढून टाकल्या होत्या. यानंतर कोकाकोलाची स्पॉन्सरशिप थांबवण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चळवळ सुरु झाली आहे.


साखरयुक्त शीतपेये आणि मधूमेह, कर्करोग आणि ह्रदयविकार यासारख्या रोगांचा धोका वाढता असताना कोका कोलाला ऑलम्पिक खेळांचे मुख्य प्रायोजक म्हणून सुरु ठेवण्याची परवानगी देणं हे IOC च्या ध्येयाशी विरोधाभास करणारे आहे. यामुळेच ऑलम्पिक धावपटूंचे प्रयत्न आणि कमी यश येण्याचे प्रमाण याला जोडणारे हे धोरण आहे. असे तज्ञांचे म्हणणे आहे.


 






ऑलम्पिक खेळामध्ये प्रसारणातील जाहिरातींवर आक्षेप


आपल्या देशातील खेळाडूंचा घसरता आलेख पाहता या साखरयुक्त पेय प्रमोट करणाऱ्या कंपन्या त्यांना आणखी खालच्या ओळीत भर घालण्यासाठी खेळाचा वापर करतात याकडे या मोहिमेने लक्ष वेधले आहे. २०२४ ऑलम्पिक खेळांच्या प्रेक्षकांना संपूर्ण प्रसारणात त्यांना दिसणाऱ्या जाहिरातींमागील हेतूविषयी माहिती द्यायला पाहिजे असाही युक्तीवाद होताना दिसतोय.


IOC ला कोककोला कंपनीचं खेळातील प्रायोजकत्व समाप्त करत निर्णायक कारवाई करण्याचं आवाहन केलं जातंय.. भविष्यातील प्रायोजकत्व नाकारण्यासाठी आणि आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी ऑलम्पिक समितीने व्यावसायिक हितसंबंधांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचं सांगितलं. या बाबत बिग सोडापासून स्वत:ला दूर करून जबाबदारी आणि प्रतिष्ठा टिकवण्याची IOC ला संधी असल्याचं सांगितलंय.


कुठून सुरुवात झाली या मागणीला?


किक बिग सोडा आउट ऑफ स्पोर्ट” ही सर्व साखरयुक्त पेयेचे प्रायोजकत्व खेळातून काढून टाकण्याच्या चळवळीची सुरुवात आहे. या मोहिमेचे नेतृत्व संबंधित जागतिक आरोग्य संस्था आणि वकिलांनी केले आहे आणि साखरयुक्त पेयांचे आपल्या आरोग्यावर आणि पृथ्वीवरील हानिकारक प्रभावांवर प्रकाश टाकला आहे. यामुळे जगभरातील क्रीडा क्षेत्रातील फूड पॉलिसीच्या धोरणांवर आता विशेष लक्ष असल्याचे दिसून येत आहे.


क्रीडा क्षेत्रातील फूड धोरणांवर लक्ष केंद्रीत


हा कार्यक्रम ब्राझील, जमैका, बार्बाडोस, कोलंबिया आणि दक्षिण आफ्रिका येथे अधिक लक्ष केंद्रित करत आहे. साखरयुक्त शीतपेयांवर कर वाढवणे, पॅकेजच्या समोर पोषक लेबले लावणे, मुलांचे अस्वास्थ्यकर अन्न आणि शीतपेयांच्या मार्केटिंगवर मर्यादा घालणे, आणि निरोगी पदार्थांना प्रोत्साहन देणे यासह सर्वोत्कृष्ट उपलब्ध पुराव्यांद्वारे समर्थित मजबूत धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी ही चळवळ महत्वाची मानली जात आहे. ऑलम्पिकचा प्रमुख प्रयोजक अनेक वर्षांपासून काम केल्यानंतर आता प्रायेजक म्हणून ऑल्म्पिकमधून कोकाकोलाची हाकालपट्टी होणार का? याकडे जगभरातील क्रीडा तज्ञांसह, आरोग्यविषयक जाणकारांचेही लक्ष आहे.