Ugandan Olympic athlete Rebecca Cheptegei News : युगांडाची ॲथलीट रेबेकाशी (Rebecca Cheptegei ) संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. रेबेका मॅरेथॉन धावपटू आहे. ती सध्या केनियामध्ये राहत होती, जिथे तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्यावर पेट्रोल शिंपडले आणि तिला आग लावली, त्यानंतर तिच्या शरीराचा 75 टक्क्यांहून अधिक भाग जळाला आहे. तिला गंभीर अवस्थेत केनियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


रेबेका (Rebecca Cheptegei ) नुकतीच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. पोलिसांनी सांगितले की, नुकत्याच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या 33 वर्षीय मॅरेथॉन धावपटूच्या शरीराचा 75 टक्क्यांहून अधिक भाग भाजला आहे. स्थानिक रिपोर्टमध्ये दिलेल्या अहवालात, दोघांमध्ये भांडण सुरू असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अलीकडेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रेबेकाने मॅरेथॉनमध्ये 44 वा क्रमांक पटकावला होता.






रेबेका हिच्यावर वेस्टर्न ट्रान्स-नोझिया काउंटीमधील तिच्या घरी हल्ला झाला. ट्रान्स-नोझिया काउंटीचे पोलिस कमांडर म्हणाले की, रेबेकाच्या एक्स बॉयफ्रेंडने पेट्रोलने भरलेले जेरी कॅन विकत घेतले, जे रेबेकावर ओतले आणि तिला आग लावली. केनियातील एल्डोरेट शहरातील मोई टीचिंग आणि रेफरल हॉस्पिटलमध्ये तिच्यावर विशेष उपचार सुरू आहेत.






कोण आहे ॲथलीट रेबेका?


रेबेकाचा जन्म 22 फेब्रुवारी 1991 रोजी युगांडा येथे झाला. आणि ती 2010 पासून रेसिंग करत आहे. रेबेकाने 2022 मध्ये थायलंडमधील चियांग माई येथे झालेल्या वर्ल्ड माउंटन आणि ट्रेल रनिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.


अलीकडच्या काळात केनियामध्ये महिला खेळाडूंवर अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या अनेक घटना पाहावयास मिळत आहेत. एप्रिल 2022 मध्ये महिला धावपटू डमारिस मुटुआ हिचा घरात तोंडावर उशी ठेवून गळा दाबून खून करण्यात आला. त्याच वेळी, याच्या काही महिन्यांपूर्वी याच शहरात ॲग्नेस टिरोपची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.  


हे ही वाचा -


Pak vs Ban : 'पाकिस्तान क्रिकेटसाठी काळा दिवस...', ​​बांगलादेशविरूद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूचा संताप


क्रीडा जगतात पाकिस्तानची नाचक्की; दिग्गज कुस्तीपटूकडून काढून घेतले जिंकलेले मेडल, जाणून घ्या प्रकरण


WTC Points Table : WTCमधून पाकिस्तानचा खेळ खल्लास; बांगलादेशची टॉप-4 मध्ये एन्ट्री, भारताची वाढली भीती