WTC points Table WTC Points Table Pakistan vs Bangladesh Test series : रावळपिंडीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीतही बांगलादेशने पाकिस्तानवर 6 विकेट्सने मात करत दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. या पराभवाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. कारण 2023-25 ​​च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये थेट प्रवेश करण्याच्या त्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशने पहिल्या कसोटीतच पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करून गणित बिघडवले होते. आता पाकिस्तानचा खेळ खल्लास झाला आहे.


बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला 9 पैकी 7 सामने जिंकणे आवश्यक होते. पण पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही कसोटीत पराभव पत्करला आणि आता गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.  पाकिस्तानने 7 सामन्यांपैकी फक्त 2 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत. अशा प्रकारे, त्याच्या खात्यात फक्त 16 गुण आहेत आणि त्याच्या गुणांची टक्केवारी 19.05 आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानसाठी पुढील वाटचाल खूपच कठीण होणार आहे, कारण त्याचे उर्वरित सामने इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांविरुद्ध होणार आहेत.


बांगलादेशने पाकिस्तानला दिला दणका 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला पुढील सर्व 7 सामने जिंकावे लागतील आणि इतर काही समीकरणांवरही अवलंबून राहावे लागेल. मात्र, त्याचे सामने जिंकणे त्याच्यासाठी सोपे नाही, कारण यातील तीन सामने इंग्लंडविरुद्ध आणि 2 सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहेत. त्याचबरोबर पुढील वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामने होणार आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांना हरवून विजय संपादन करणे सोपे काम म्हणता येणार नाही.


बांगलादेशची मोठी झेप


त्याचबरोबर बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत गुणतालिकेत दोन स्थानांनी झेप घेतली असून संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशने आत्तापर्यंत 6 सामने खेळले आहेत, ज्यात 3 जिंकले आहेत आणि फक्त 3 गमावले आहेत. अशा प्रकारे त्याच्या खात्यात 33 गुण असून गुणांची टक्केवारी 45.83 झाली आहे. आता फक्त भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड बांगलादेशच्या पुढे आहेत. पाकिस्तानविरुद्धचे दोन कसोटी सामने जिंकल्यानंतर बांगलादेशने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र आता बांगलादेशला आपले उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत. पण आता काही आठवड्यात भारतासोबत 2 कसोटी सामने खेळणार आहे. भारताला पराभूत करणे खूप कठीण काम आहे. पण रोहित शर्माच्या टीमने बांगलादेशला हलक्यात घेता येणार नाही.


टीम इंडिया पहिल्या स्थानावर


जर आपण टॉप 3 बद्दल बोललो तर टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडिया सध्या 68.51 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे गुण सध्या 62.5 आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फारच किरकोळ फरक आहेत. तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे.


हे ही वाचा -


PAK VS BAN 2nd Test : पाकिस्तानच्या घरात घुरून बांगलादेशनं कापलं नाक, रचला इतिहास, मालिका खिशात


WTC 2025 Final Date : क्रिकेटच्या पंढरीत 'या' दिवशी रंगणार WTC 2025 फायनल! ICCकडून तारखांची घोषणा