Tokyo Olympics 2020 : जगभरात कोरोना महामारी सुरु असताना जपानमध्ये उद्यापासून (शुक्रवार 23 जुलै) टोकियो ऑलिम्पिक 2020 सुरु होत आहे. भारत 25 व्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. भारत 18 क्रीडा प्रकारांमध्ये 127 सदस्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी टीम पाठवित आहे. ही स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान खेळली जाणार आहे. भारतात टोकियो ऑलिम्पिकचे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर (Sony Sports Network) आणि सोनीलाईव्हवर (SonyLIV) थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.


टोकियो ऑलिम्पिक लाइव्ह ब्रॉडकास्ट : टोकियो ऑलिम्पिकचे अधिकृत ब्रॉडकास्टर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ऑलिम्पिकचे मोठे आणि भव्य प्रसारण घेऊन येणार आहे. सोनी 5 नेटवर्क चॅनेलवर 4 भाषांमध्ये ऑलिंपिकचे थेट प्रसारण करेल. ऑलिम्पिक खेळ टोकियो 2020 ची थेट लाईव्ह 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 रोजी सोनी सिक्स, सोनी टेन 1, सोनी टेन 2, सोनी टेन 3 आणि सोनी टेन 4 चॅनेलवर सुरू होईल. याशिवाय सोनीलाईव्हवर ऑलिम्पिक खेळांचे प्रसारण करणार आहे. 


दूरदर्शनही टोकियो ऑलिम्पिक लाइव्ह प्रसारण करणार
सोनी स्पोर्ट्स नेटवर्क व्यतिरिक्त, राष्ट्रीय प्रसारक प्रसार भारती यांचे दूरदर्शन देखील टोकियो ऑलिम्पिक लाइव्ह प्रसारण करणार आहे. पण दूरदर्शन फक्त टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करणार आहे.


केवळ 44 भारतीय खेळाडू उद्धाटन सोहळ्याला उपस्थित
टोकियो ऑलिम्पिकचा उद्धाटन सोहळा शुक्रवारी होणार आहे. या सोहळ्यासाठी 15 देशांचे प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. स्पर्धेवर असलेला कोरोनाचा धोका लक्षात घेता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीनं संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी एकूण 125 खेळाडू जपानला रवाना झाले आहेत. त्यापैकी केवळ 44 खेळाडू आणि सहा अधिकारी या स्पर्ध्येच्या उद्धाटन सोहळ्यात भाग घेणार आहेत. 


टोकियो ऑलिम्पिक खेळांचं आयोजन 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या काळात जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. गेल्या वर्षी होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने कोरोनामुळं पुढे ढकलली होती. . जगभरातील क्रीडापटूंचा समावेश असलेले ऑलिम्पिक सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी जपानच्या वतीनं संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. स्पर्धेवर असणारे कोरोनाचे सावट लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी एक स्पेशल प्लॅन तयार करण्यात येत असल्याचीही माहिती आहे.