Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिक मध्ये सहभागी होण्यास गेलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये तीन जणांना कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. हे केवळ ऑलिम्पिकच्या हेल्थ स्टेटस अॅपमध्ये चुकीची माहिती भरल्याने घडलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. 


भारतीय संघाचे अधिकारी प्रेम वर्मा यांनी स्पष्ट केलं की कोणत्याही खेळाडूमध्ये कोरोनाचे लक्षण दिसत नाही, कोणीही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह नाही. हे केवळ हेल्थ स्टेटस अॅपमध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे घडलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 


केवळ 44 भारतीय खेळाडू उद्धाटन सोहळ्याला उपस्थित
टोकियो ऑलिम्पिकचा उद्धाटन सोहळा शुक्रवारी होणार आहे. या सोहळ्यासाठी 15 देशांचे प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. स्पर्धेवर असलेला कोरोनाचा धोका लक्षात घेता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीनं संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी एकूण 125 खेळाडू जपानला रवाना झाले आहेत. त्यापैकी केवळ 44 खेळाडू आणि सहा अधिकारी या स्पर्ध्येच्या उद्धाटन सोहळ्यात भाग घेणार आहेत. 


 




टोकियो ऑलिम्पिक खेळांचं आयोजन 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या काळात जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. गेल्या वर्षी होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने कोरोनामुळं पुढे ढकलली होती. . जगभरातील क्रीडापटूंचा समावेश असलेले ऑलिम्पिक सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी जपानच्या वतीनं संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. स्पर्धेवर असणारे कोरोनाचे सावट लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी एक स्पेशल प्लॅन तयार करण्यात येत असल्याचीही माहिती आहे. 


महत्वाच्या बातम्या :