पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिकला (Paris Olympics) 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं (India) 7 पदकं जिंकली होती. यंदा पॅरिस येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारताचे 117 खेळाडू सहभागी झाले आहेत. भारताला गत ऑलिम्पिकच्या तुलनेत यंदा चांगल्या कामगिरीची आशा आहे. गेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकं कुणी जिंकली आहेत (Most Medals In Olympics History) हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वाधिक पदकं जिंकणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका (USA) पहिल्या स्थानावर आहे. अमेरिका पदक जिंकण्यात सर्वात आघाडीवर आहे. अमेरिकेच्या जवळपास देखील दुसरे देश नाहीत.


ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकं जिंकणारे देश कोणते?


अमेरिकेनं ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 1065 सुवर्णपदकं अमेरिकेच्या नावावर आहेत. एक हजारांपेक्षा अधिक सुवर्णपदकं जिंकणारा अमेरिका एकमेव देश आहे. याशिवाय त्यांनी 835 रौप्य आणि 738 कांस्य पदकं जिंकली आहेत. अमेरिकेच्या नावावर 2638 पदकं आहेत. 


ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकण्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर रशिया आहे. रशियानं आतापर्यंत 1010 पदकं जिंकली आहेत. त्यामध्ये 395 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. तिसऱ्या स्थानावर ग्रेट ब्रिटन असून त्यांनी 918 पदकं जिंकली असून त्यामध्ये 285 सुवर्णपदकांचा समावेश आहे. ग्रेट ब्रिटनची लोकसंख्या केवळ 7 कोटी असून त्यांचा ऑलिम्पिकमध्ये दबदबा पाहायला मिळतो.  


अमेरिका, रशिया आणि ब्रिटननंतर चौथ्या स्थानावर चीन आहे. ऑलिम्पिकमध्ये चीननं 262 सुवर्ण पदकं जिंकली आहेत यानंतर पाचव्या स्थानावर फ्रान्स आहे. त्यांनी 223 सुवर्णपदकं जिंकली आहेत. म्हणजेच सर्वाधिक पदकं जिंकणाऱ्या पहिल्या पाच देशांमध्ये अमेरिका, रशिया, ग्रेट ब्रिटन, चीन आणि फ्रान्सचा समावेश आहे.  


दरम्यान, भारतानं ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक आणि सांघिक अशी मिळून एकूण 35 पदकं जिंकली आहेत. भारतानं पहिलं ऑलिम्पिक पदकं 1900 मध्ये जिंकलं होतं. ते ऑलिम्पिक पॅरिसमध्येच भरलं होतं. गेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतानं 7 पदकं जिंकली होती. यंदा भारतीय संघानं 117 खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी पाठवलं आहे. यंदा भारताला हॉकीच्या पुरुष आणि महिला संघाकडून इतर खेळाडूंकडून पदकाची आशा आहे.  नीरज चोप्रा यावेळी सुवर्णपदक मिळवून देणार का याकडे देखील लक्ष लागलं आहे.


संबंधित बातम्या :



Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना किती पैसे मिळतात? जाणून घ्या


भारतीय खेळाडूंना विराट कोहलीचा खास मेसेज...; पॅरिस ऑलिम्पिकसाठी दिल्या शुभच्छा