पॅरिस : येत्या काही दिवसांमध्ये पॅरिसमध्ये ऑलिम्पिक (Paris Olympics) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीमध्ये (Hockey) दीर्घकाळ कामगिरी बजावल्यानंतर गोलकीपर पीआर श्रीजेश (PR Sreejesh) यांनी मोठी घोषणा केली आहे. यंदाचं पॅरिस ऑलिम्पिक ही माझी शेवटची स्पर्धा असेल, असं पीआर श्रीजेश यांनी म्हटलं. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील किझक्कम्बलम गावातील शेतकरी कुटुंबातील पीआर श्रीजेश यांचा प्रवास हॉकीच्या टीमचा गोलकीपर इथपर्यंत पोहचला. भारताच्या हॉकी टीममध्ये पीआर श्रीजेश यांनी महत्त्वाचं स्थान निर्माण केलं होतं. भारताच्या हॉकी टीमचा कर्णधार म्हणून देखील पीआर श्रीजेश यांनी कामगिरी पार पाडली आहे. गेल्या दहांवर्षांपेक्षा अधिक काळ पीआर श्रीजेश भारताच्या हॉकी संघाचा आधारस्तंभ राहिले आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी भारताच्या हॉकी टीममध्ये पदार्पण केलं होतं.


पीआर श्रीजेश यांनी तीन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या संघाचं प्रतिनिधीत्व केलेलं आहे. श्रीजेश यांचा हॉकीमध्ये करिअर करण्यापूर्वी अॅथलेटिक्सकडे ओढा होता. त्यांनी  स्प्रिंट, लांब ऊडी आणि व्हॉलीबॉलमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, प्रशिक्षक जयकुमार आणि रमेश कोलप्पा यांच्या मार्गदर्शनात पीआर श्रीजे हॉकीकडे वळले. 



पीआर श्रीजेश यांनी सोशल मीडियावर पोस्टकरुन प्रस्तावित निवृत्तीबाबत घोषणा केली. माझ्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीच्या अंतिम टप्प्यावर उभा आहे, असं पीआर श्रीजेश यांनी म्हटलं.  हॉकीमधील या प्रवासात  ज्यांनी पाठिंबा दिला त्यामध्ये कुटुंबीय, संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांसह चाहत्यांच्या ऋणात राहणार असल्याचं श्रीजेश यांनी म्हटलं. 


41 वर्षानंतर भारताला हॉकीमध्ये पदक


पॅरिस ऑलिम्पिक हे पीआर श्रीजेश यांचं अखेरचं ऑलिम्पिक ठरणार आहे. या ऑलिम्पिकनंतर निवृत्त होण्याचा निर्णय पीआर श्रीजेश यांनी घेतला आहे.  पीआर श्रीजेश यांनी 2006 मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतून भारतीय हॉकीमध्ये पदार्पण केलं. हॉकी इंडियाच्या वरिष्ठ टीममध्ये पीआर श्रीजेश यांना 2010 मध्ये संधी मिळाली. तेव्हापासून भारतीय हॉकी संघात अनेक बदल होत गेले मात्र, पीआर श्रीजेश यांच्यावर भारतीय हॉकीच्या व्यवस्थापनाचा विश्वास कायम होता.


पीआर श्रीजेश यांनी भारतासाठी आतापर्यंत 328  मॅच खेळल्या आहेत. श्रीजेश यांनी तीन ऑलिम्पिकमध्ये देखील सहभाग घेतला आहे. राष्ट्रकूल स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्वकप स्पर्धेतही भारताचं प्रतिनिधीत्व केलं. 


टोक्यो ऑलिम्पिमध्ये भारताच्या हॉकी संघाला 41 वर्षानंतर कांस्य पदक मिळालं होतं, त्यामध्ये पीआर श्रीजेश यांचं योगदान महत्त्वाचं होतं. हॉकी इंडियानं 'विन इट फॉर श्रीजेश' अभियान सुरु केलं आहे.हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ. दिलीप टर्की यांनी संघातील इतर खेळाडू श्रीजेश यांना शानदार फेअरवेल देण्यासाठी प्रयत्न करतील, असं म्हटलं. 






संबंधित बातम्या :


Ravindra Jadeja:रवींद्र जडेजाला श्रीलंका दौऱ्यात का संधी नाही? अजित आगरकरनं सगळं समजावून सांगितलं