Paris Olympics 2024 Today Schedule: पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत (Paris Olympics 2024) भारताच्या मनू भाकरने (Manu Bhaker) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे.
अवघ्या 22 वर्षीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक जिंकून इतिहास रचला. आता तिसऱ्या दिवशी म्हणजे 29 जुलैलाही भारतीय संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. मनू भाकर पुन्हा एकदा 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात पदकाच्या शर्यतीत उतरणार आहे. रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुता 10 मीटर एअर रायफल आणि पुरुष तिरंदाज प्रकारात सुवर्णपदक मिळण्याच्या आशा आहे. पाहा आजचे 29 जुलै रोजी भारताचे ऑलिम्पिकचे वेळापत्रक....
तिरंदाजी-
पुरुष सांघिक उपांत्यपूर्व फेरी: तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा, प्रवीण जाधव - संध्याकाळी 6.30
बॅडमिंटन-
पुरुष दुहेरी (ग्रुप स्टेज): सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेल (जर्मनी) - दुपारी 12 वा.
महिला दुहेरी (ग्रुप स्टेज): अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो विरुद्ध नामी मत्सुयामा आणि चिहारू शिदा (जपान) - दुपारी 12.50 वा.
पुरुष एकेरी (ग्रुप स्टेज): लक्ष्य सेन विरुद्ध ज्युलियन कॅरेजी (बेल्जियम) - संध्याकाळी 5.30
शूटिंग-
10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रता: मनू भाकर आणि सरबज्योत सिंग, रिदम सांगवान आणि अर्जुन सिंग चीमा - दुपारी 12.45 वा.
पुरुष ट्रॅप पात्रता: पृथ्वीराज तोंडैमन - दुपारी 1:00 वा
10 मीटर एअर रायफल महिला अंतिम फेरी: रमिता जिंदाल - दुपारी 1.00 वा
10 मीटर एअर रायफल पुरुषांची अंतिम फेरी: अर्जुन बबुता - दुपारी 3.30 वा
हॉकी-
पुरुषांचा पूल ब सामना: भारत विरुद्ध अर्जेंटिना - दुपारी 4.15
टेबल टेनिस-
महिला एकेरी (32 ची फेरी): श्रीजा अकुला विरुद्ध जियान झेंग (सिंगापूर) - रात्री 11.30
पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत (Paris Olympics 2024) 10 मीटर एअर रायफल महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या रमिता जिंदालने (Ramita Jindal) इतिहास रचला आहे. रमितान जिंदालने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. रमिता जिंदाल 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात पोहचणारी तिसरी स्पर्धेक ठरली आहे. 20 वर्षीय रमिता जिंदालने क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 631.5 गुण मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. रमिता जिंदालने सहाही फेरीत 100 पेक्षा जास्त गुण मिळवले.