Paris Olympics 2024 : पाकिस्तानच्या अर्शद नदीमने (Arshad Nadeem) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. मात्र त्याच्या ऐतिहासिक विजयानंतर नवा वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. वास्तविक पाहिलं तर अंतिम सामन्यानंतर अर्शद नदीमची डोप चाचणी (Arshad Nadeem Dope Test) घेण्यात आली होती. त्यानंतर असा दावा केला जात आहे की पाकिस्तानी खेळाडूने काही एनर्जेटिक पदार्थ सेवन केलं होतं, त्यामुळे त्याचा भाला 92.97 मीटरपर्यंत गेला. ही बातमी पसरताच नीरज चोप्राला (Neeraj Chopra) सुवर्णपदक मिळावे अशी मागणी जोर धरू लागली. जाणून घेऊया या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे.


डोप चाचणी म्हणजे काय?


जगातील जवळपास सर्वच क्रीडा स्पर्धांमध्ये डोप चाचणी घेतली जाते. ही चाचणी सामान्यतः लघवी आणि रक्ताद्वारे केली जाते. कोणत्याही खेळाडूने कोणतेही औषध, ताकद वाढवणारी टॅब्लेट वापरली आहे का किंवा वैद्यकीय भाषेत कोणत्याही प्रकारे फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे का हे जाणून घेणे हा त्यामागचा उद्देश आहे. ऑलिम्पिकमध्ये अनेक खेळाडू डोपिंगमध्ये दोषी आढळले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इराणचा सज्जाद सेहेन आणि नायजेरियाची बॉक्सर सिंथिया हे दोषी आढळले होते.


दावा काय आहे?


सोशल मीडियावर लोक विशेषतः पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. जेव्हा प्रत्येक खेळाडू 88 ते 89 मीटर अंतर गाठू शकतो, तेव्हा नदीमने 92.97 मीटर अंतरावर भाला फेकला कसा? असा प्रश्न एकाने उपस्थित केला आहे. त्यावर कोणीतरी अर्शदचा फोटो शेअर केला आणि दावा केला की त्याच्या चेहऱ्यावरूनच लक्षात येतंय की त्याने ड्रग्स सेवन केलं होतं. पाकिस्तानी खेळाडूच्या समर्थनार्थ अनेक लोक समोर आले असले तरी बहुतेक लोक त्याला ट्रोल करण्यात व्यस्त आहेत.


नीरज चोप्राला गोल्ड मेडल मिळेल का?


वास्तविक, डोप चाचणी घेण्याची प्रथा फार पूर्वीपासून सुरू आहे. अनेकदा पदक जिंकल्यानंतर खेळाडूंची लगेच डोप चाचणी केली जाते. भालाफेक स्पर्धा संपल्यानंतर केवळ पाकिस्तानचा अर्शद नदीमच नाही तर भारताचा नीरज चोप्रा आणि ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स यांचीही डोप चाचणी झाली. त्याचा अहवालही समोर आला आहे. 


पदक विजेत्या खेळाडूंची डोप चाचणी ही नवीन गोष्ट नाही. हे केवळ ॲथलीटने कोणतीही फसवणूक केली नाही याची खात्री करण्यासाठी केले जाते. अशा परिस्थितीत अर्शद नदीम अंमली पदार्थ सेवन किंवा अन्य कोणत्याही आरोपात दोषी आढळल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. कारण ही डोप चाचणी केवळ प्रोटोकॉल पाळण्यासाठी घेण्यात आली होती आणि तो कोणत्याही संशयास्पद स्थितीत सापडला म्हणून नाही.


ही बातमी वाचा: