Vinesh Phogat Paris Olympics 2024: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटचा (Vinesh Phogat) पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील (Paris Olympics 2024) प्रवास 7 ऑगस्ट रोजी एका अनपेक्षित वळणावर संपला. विनेश फोगाटला 50 किलो वजन मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्यामुळे अंतिम सामन्यात अपात्र ठरवण्यात आले. तसेच या दुर्दैवी घटनेमुळे विनेश फोगाटला कोणतेही पदक मिळाले नाही.
विनेश फोगाटलाला 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत तिने चमकदार कामगिरी केली. मात्र सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी त्याचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. या कारणास्तव विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयावरुन भारताने सीएएसकडे धाव घेतली आहे. विनेश फोगाटला रौप्य पदक देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
विनेश फोगटची कारकीर्द आणि यश
विनेश फोगटचा जन्म 25 ऑगस्ट 1994 रोजी हरियाणातील चरखी दादरी येथे झाला. वडील राजपाल फोगाट यांच्या निधनानंतर, त्यांना त्यांचे काका महावीर सिंग फोगट यांनी दत्तक घेतले आणि प्रशिक्षण दिले. विनेशने 2018 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आणि भारतीय कुस्तीमध्ये सुवर्ण अक्षरात तिचे नाव नोंदवले. विनेश फोगाटच्या या कामगिरीमुळे तिल 2020 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न, 2016 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विनेश फोगटची संपत्ती-
विनेश फोगटची अंदाजे एकूण संपत्ती सुमारे 36.5 कोटी रुपये आहे. विनेश फोगाटला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून मासिक पगार मिळतो. हा पगार वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत मिळतो. याशिवाय, बेसलाइन व्हेंचर्स आणि कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स सारख्या कंपन्यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून विनेश फोगाट चांगली कमाई करते.
विनेश फोगटचे आलिशान घर आणि कार कलेक्शन-
विनेश फोगटच्या जीवनशैलीत लक्झरीला विशेष स्थान आहे. हरियाणामध्ये त्यांचा करोडो रुपयांचा आलिशान बंगला आहे. विनेशकडे तीन महागड्या गाड्या आहेत - टोयोटा फॉर्च्युनर ज्याची किंमत सुमारे 35 लाख रुपये आहे, टोयोटा इनोव्हा ज्याची किंमत सुमारे 28 लाख रुपये आहे आणि मर्सिडीज-बेंझ जीएलई ज्याची किंमत सुमारे 1.8 कोटी आहे. ही सर्व संपत्ती आणि आरामदायी जीवनशैली हे त्याच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे.
विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा-
वजनामुळे अपात्र ठरल्यानंतर भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. आई कुस्ती माझ्याविरूद्ध जिंकली. तुमचं स्वप्न माझी हिंमत तुटली आहे. आता माझ्यात जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती, 2001 ते 2024 तुम्ही सर्व सदैव माझ्यासोबत असाल, मी ऋणी राहीन, असं म्हणत विनेशने कुस्तीला अलविदा केला.