Olympic 2020 : कोरोना व्हायरसमुळे अख्खं जग हतबल झालं आहे. अशातच कोरोना व्हायरसमुळे जुलै-ऑगस्टमध्ये होणारं टोक्यो ऑलिम्पिक रद्द करून एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी टोक्यो ऑलिम्पिक रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, ऑलिम्पिक नियोजित वेळेनुसार घेण्यावर ठाम असलेलं जपान सरकार ने आधीच स्पष्ट केलं होतं की, आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थामस बाक यांच्यासमोर ऑलिम्पिक एक वर्षांसाठी पुढे ढकलण्याच्या प्रस्ताव ठेवणार आहे. अमेरिका, कॅनडा यांसारख्या देशांनी ऑलिम्पिकसाठी आपल्या देशातून एकही खेळाडू न पाठवण्याचा निर्णय घेतला होता.


जपानच्या पंतप्रधानांनी सांगितलं की, त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे ऑलिम्पिक एक वर्षासाठी पुढे ढकण्यासाठी विनंती केली होती. यावर फेरविचार करत आयओसीने ऑलिम्पिक एक वर्षांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.



जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आयओसी अध्यक्ष थामस बाक यांच्यासोबत बोलल्यानंतर सांगितलं की, 'मी ऑलिम्पिक एक वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अध्यक्ष बाक यांनी यावर आपली सहमती दर्शवली.'


कॅनडा आणि अमेरिकेचा खेळाडूंना पाठवण्यास नकार


कोरोना व्हायरसचा धोका पाहता कॅनडाने आधीच स्पष्ट केलं होतं की, जर ऑलिम्पिक खेळांचं आयोजन यंदाच्या वर्षी होणार असेल तर ते आपल्या खेळाडूंना पाठवणार नाहीत. रविवारी कॅनडाने ऑलिम्पिक समितीला आदेश दिले होते. त्यानंतर अमेरिकेनेही 2020मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपल्या देशाचे खेळाडू पाठवण्यास नकार दिला होता.


पाहा व्हिडीओ : पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा : अनिल देशमुख



न्यूझीलंड, जर्मनी, इंग्लंडनेही ऑलिम्पिक रद्द करण्याची मागणी


कॅनडा आणि अमेरिकेच्या निर्णयानंतर न्यूझीलंड, जर्मनी, इंग्लंडदेखील ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी ऑलिम्पिक समितीवर दबाव आणत होते. सर्व देशांचं म्हणणं होतं की, ऑलिम्पिकदरम्यान, खेळाडूंना कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे यासर्व देशांनी ऑलिम्पिक खेळांना एक वर्षांसाठी स्थगित करण्याची मागणी केली होती.


भारतीय खेळाडूंनीही केला होता विरोध


भारतीय अॅथलिट्स ऑलिम्पिक खेळ पुढे ढकलण्याची मागणी करत होते. भारताचा पहिल्या क्रमांचा रेसलर बजरंग पुनियाने यासंदर्भात बोलताना सांगितले होते की, 'जर जिवंत राहिलो तर कधीना कधी ऑलिम्पिक खेळण्याची संधी नक्कीच मिळेल. यावरून स्पष्ट होत होतं की, खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या विरोधात होते. याव्यतिरिक्त प्रॅक्टिस सेशन रद्द झाल्यामुळे खेळाडूंना प्रॅक्टिस करणंही अशक्यचं होतं.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोनाग्रस्तांसाठी आपल्या हॉटेल्सचं रूपांतर हॉस्पिटल्समध्ये करणार?


Coronavirus | जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकला


IND Vs SA, Coronavirus | भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द