जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी “सध्याची स्थिती पाहता ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन पुढे ढकललं जाण्याची शक्यता असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक्स समितीवरील वाढत्या दबावामुळे त्यांनी देखील मान्य केलं आहे की कोविड-19 च्या वाढत्या संकटामुळे टोक्यो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो”.
तसेच जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सांगितले की, 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात खूप अडचणी येत आहेत. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आम्ही लवकरच निर्णय घेऊ. 24 जुलै पासून या खेळाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सुद्धा सांगितलं आहे की, अशी परिस्थितीत ऑलिम्पिक खेळांना स्थगित केलं जाऊ शकतं.
टोकियोमध्ये 24 जुलै ते 9 ऑगस्ट या दरम्यान ही ऑलिम्पिक स्पर्धा खेळावण्यात येणार आहे. पण आता ऑलिम्पिकचं आयोजन कोरोनाच्या सावटाखाली आलं आहे. करोनाच्या संकटामुळे स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलावे अशी मागणी विविध स्तरातून केली जात होती. अखेर आता जपान सरकार ही स्पर्धा पुढे ढकलण्याच्या विचारात आहे. दरम्यान ऑलिम्पिकमधून कॅनडापाठोपाठ आता ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा ऑलिम्पिक कमिटीनेही आपला संघ ऑलिम्पिकला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
Corona Outbreak | अमेरिकेत 24 तासात 100 तर, इटलीत गेल्या 24 तासात 651 रुग्णांचा बळी
दरम्यान जगभरातील जवळपास सर्वच देश कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. झपाट्याने पसरत असलेल्या या व्हायसर पुढे अमेरिका, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलियासारखे अनेक मोठे देश हतबल दिसत आहेत. वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहिल्यानंतर कुणाला वाचवायचं आणि कुणाला नाही, असा प्रश्न डॉक्टरांना पडत असल्याचं चित्र आहे.
गेल्या पाच दिवसात जगभरात जवळपास साडेचार हजार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील ही आकडेवारी असली तरी ती भारतासाठी चिंतेंची बाब आहे. आपण जेवढा विचार करतोय त्यापेक्षा वेगाने हा व्हायरस पसरतो आहे.
Sensex falls down | सेन्सेक्स 2600 अंकांनी कोसळला, निफ्टीतही 625 अंकांची घसरण