Tokyo Olympics 2020: टोकियो येथे सुरु असलेल्या खेळाच्या महाकुंभचा दुसरा दिवस भारतासाठी गोड आणि कटू ठरला. भारतीय खेळाडूंनी अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. मात्र, भारताने पदकांचे खाते उघडले आहे. दुसऱ्या दिवशी मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकून भारताचं खातं उघडलं. आता सर्वांचे लक्ष तिसऱ्या दिवस म्हणजे 25 जुलैवर लागले आहे. रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेरी कॉम, पीव्ही सिंधू आणि जी सॅथियानसारखे स्टार खेळाडू मैदानात उतरतील. भारतीय वेळेनुसार रविवारी टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक जाणून घेऊया.
बॅडमिंटन:
सकाळी 7: 10 - पीव्ही सिंधू विरुद्ध महिला एकेरीच्या गटात केनिया पॉलिकार्पोवा (इस्त्राईल)
बॉक्सिंग:
दुपारी 1:30 वाजता 51 किलो वजनीगटांच्या सुरुवातीच्या फेरीत एमसी मेरी कोम विरुद्ध हरनांडेझ गार्सिया (डोमिनिका रिपब्लिक)
03:06 दुपारी: 51 किलो वजनीगटातील सुरुवातीच्या सामन्यात मनीष कौशिक विरुद्ध ल्यूक मॅककोर्मॅक (ब्रिटेन)
हॉकी:
दुपारी 03:00 - पुरुषांच्या पूल ए सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
सेलिंग:
सकाळी 8:35 - महिलांची वन पर्सन सेलिंग, लेझर रेडियल (पहिली शर्यत, दुसरी शर्यत) नेत्रा कुमानन
सकाळी 11:05 - पुरूषांची एक व्यक्ती सेलिंग, लेझर (पहिली शर्यत, दुसरी शर्यत) भारताचे विष्णू सरवनन
नौकाविहार:
सकाळी 06:40 - लाइटवेट पुरूषांच्या डबल स्कल्स (भारत)
नेमबाजी :
सकाळी 05:30 - महिला 10 मीटर एअर रायफल पात्रता यशस्विनीसिंग देसवाल आणि मनु भाकर
सकाळी 06:30 : स्कीट पुरुषांची पात्रता - पहिला दिवस (मैराज अहमद खान आणि अंगद वीरसिंह बाजवा)
सकाळी 9.30 वाजता: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल पात्रतेमध्ये दीपक कुमार आणि दिव्यांशसिंग पंवार.
टेबल टेनिस:
सकाळी 10:30 वाजता - पुरुष एकेरीची दुसरी फेरी: जी सॅथियान विरुद्ध लाम सियू हाँग (हाँगकाँग)
दुपारी 12:00 : महिला एकेरीची दुसरी फेरी : मानिका बत्रा विरुद्ध मार्गारेटा पेसोत्स्का (युक्रेन)
टेनिस:
महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत सानिया मिर्झा आणि अंकिता रैना विरुद्ध लिडमायला आणि नादिया किचनोक (युक्रेन)
पोहणे:
दुपारी 3:32 - महिला 100 मीटर बॅकस्ट्रोक, पहिला हीट- माना पटेल
दुपारी 4:26 - पुरुषांचा 100 मीटर बॅकस्ट्रोक: तिसरा हीट - श्रीहरी नटराज