Tokyo Olympics 2020 : टोकियो इथं सुरु असलेल्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. जेव्हा एखादे पदक मिळते तेव्हा त्या पदकामागे खेळाडूची मेहनत, कुटुंबाची साथ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंना घडवणारा प्रशिक्षक यांचे मोठे योगदान असते.  मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात  भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. मीराबाईला चानूचे प्रशिक्षक विजय शर्मा यांनी भारतील ऑलिम्पिक संघ आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) 10 लाख रुपये रोख पुरस्कार देण्यात येणार आहे.


इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांची पुरस्काराची रक्कमची घोषणा करण्यात आली आहे. गोल्ड मेडल (सुवर्ण पदक) मिळवणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षकाला 12.5 लाख रुपये, सिल्वर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षकाला 10 लाख रूपये आणि ब्रान्झ मेडल  मिळवणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षकाला 7.5 लाख रूपये देणार आहे.


आयईओ महासचिव राजीव मेहता म्हणाले, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. ते दिवस रात्र मेहनत घेत असतात. उत्तम खेळाडूच्या यशामध्ये प्रशिक्षकाचे मोठे योगदान असते.


गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूला 75 लाख रूपये


आयईओने गुरुवारी घोषणा केली की, टोकियो इथं सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूला 75 लाख रुपये, सिलव्हर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूला 40 लाख आणि कांस्य पदक मिळवणाऱ्या खेळाडूला 25 लाख रुपये देण्यात येणार आहे. 


मीराबाई चानूनं शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर  क्लीन अॅंड जर्कमध्ये मीराबाई चानूनं 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं. मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरं पदक मिळवून दिलं आहे. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनगटात चीनच्या जजिहूला सुवर्णपदक मिळालं आहे. मीराबाईनं भारताला मिळवून दिलेल्या पहिल्या पदकानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.