India vs Pakistan Hockey Asian Champions Trophy 2024 : आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला भारतीय संघाने पराभवाची धूळ चारली आणि करोडो भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा नाचण्याची संधी दिली आहे. 
आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करत विजयी घोडदौड सुरूच ठेवली. आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाचपैकी पाच सामने जिंकून भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे.  


याआधीच उपांत्य फेरीत पोहोचलेल्या भारतीय हॉकी संघाने यापूर्वी चीनचा 3-0, जपानचा 5-1, मलेशियाचा 8-1 आणि कोरियाचा 3-1 असा पराभव केला आहे. दुसरीकडे महान फॉरवर्ड ताहिर जमानच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाने मलेशिया आणि कोरियासोबत 2-2 अशी बरोबरी साधली. त्याने जपानचा 2-1 आणि चीनचा 5-1 असा पराभव केला, तर आता त्याला भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले.


सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानचा पण....


सामन्यादरम्यान पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळाली. सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानकडून अहमद नदीमने पहिल्या क्वार्टरच्या सातव्या मिनिटाला केला. येथे शाहीनने एक शॉट खेळला जो नदीमने वळवला आणि गोल केला. यासह पाकिस्तानने या सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर 13व्या मिनिटाला भारताने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत भारत-पाकिस्तानच्या गोलमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली.


'सरपंच' ठरला विजयाचा हिरो


दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला कर्णधार हरमनप्रीतने भारताला आघाडी मिळवून दिली. अभिषेकच्या इंजेक्शनवर हरमनप्रीतने गोलपोस्टच्या मध्ये शामदार गोल मारला. जो निर्णायक ठरला.


भारताचा पाकिस्तानवर 8 वा विजय


आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पाकिस्तानवरचा हा 8वा विजय आहे. दोन्ही संघांमधील हा 12 वा सामना होता. या काळात पाकिस्तानला केवळ 2 सामने जिंकता आले आहेत. 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.


हे ही वाचा -


"मी निवडकर्ता असतो तर अय्यरला कोणत्याच संघात घेतलं नसतं...", पाकिस्तानच्या खेळाडूच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ


Afro-Asia Cup Update : पुढील वर्षी कोहली-बाबर, आफ्रिदी-बुमराह एकाच संघात खेळणार? जय शाह घेणार मोठा निर्णय


IND vs BAN : चेन्नईत होणार 'गेम', रोहित-गंभीरचा मोठा प्लॅन; 3-4 दिवसात बांगलादेशचा खेळ होणार खल्लास?