Bajrang Punia Indian Flag Insult : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आज भारतात परतली. त्यांच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर हजारोंचा जनसमुदाय पोहोचला होता. तिचे भव्य स्वागत पाहून विनेश फोगाट भावूक झाली.


विनेश फोगाटच्या स्वागतासाठी हजारो क्रीडा चाहते तर आलेच पण तिचे सहकारी कुस्तीपटूही तिच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले होते. त्यात बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांचाही समावेश होता. यावेळी बजरंग पुनियाने एक चूक केल्याने त्याला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.






तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप


भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियावर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. विनेश फोगाटच्या स्वागतासाठी बजरंग पुनिया दिल्ली विमानतळावर पोहोचला होता. यावेळी विनेश फोगाट गाडीवर बसून चाहत्यांचे आभार मानत होती. दरम्यान, बजरंग पुनिया तिरंग्याच्या पोस्टरवर उभा होता. तो कारच्या बोनेटवर बूट घालून उभा होता. तिथून बजरंग गर्दी आणि मीडिया हाताळत होता आणि गाडीच्या बोनेटवर तिरंग्याचे पोस्टर चिकटवले होते. त्यावर बजरंग पाय ठेवत होता.






सोशल मीडियावर टीका


आता बजरंग पुनियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून लोक बजरंगवर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप करत आहेत आणि टीका करत आहेत. त्याचबरोबर काही लोक बजरंगचा बचावही करत आहेत. बजरंगने ही चूक नकळत केल्याचे लोकांचे म्हणणे आहे.






अपील फेटाळल्यानंतर विनेश परतली भारतात


विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये विनेशने एका दिवसात सलग तीन सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.


विनेश पहिल्यांदाच ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचली होती आणि तिला किमान रौप्यपदकाची खात्री होती, पण 100 ग्रॅम जास्त वजनामुळे तिला फायनलपूर्वी अपात्र ठरवण्यात आले.


त्यानंतर विनेश अंतिम खेळू शकली नाही आणि तिला रौप्य पदकही मिळाले नाही. अपात्र ठरल्यानंतर विनेशने रौप्य पदकासाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (सीएएस) मध्ये अपील केले होते. त्यांचे अपील CAS ने फेटाळले.


संबंधित बातमी :


Samit Dravid Six : राहुल द्रविडचा पोरगाही क्रिकेटमध्ये करणार धमाका? डिव्हिलियर्ससारख्या स्फोटक शैली ठोकतोय षटकार - Video


Jay Shah No Mayank Yadav : 'कोणती गारंटी नाही तो संघात असेल...' टीम इंडियाच्या 'स्पीड गन'बाबत जय शाह यांचं मोठे वक्तव्य


MS Dhoni IPL 2025 : मोठा ट्विस्ट! MS धोनीबद्दल आम्ही असे काही बोललोच नाही... CEOचा मोठा खुलासा