CSK CEO Kasi Viswanathan on Uncapped Player Rule IPL 2025 : आयपीएलच्या पुढील हंगामासाठी मेगा लिलाव होणार आहे. यासाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआय आणि सर्व फ्रँचायझींमध्ये बैठक झाली होती. या बैठकीनंतर आयपीएल लिलावात 'अनकॅप्ड प्लेअर रूल' परत करण्याबाबत बरीच चर्चा झाली. हा नियम परत आला तर चेन्नई सुपर किंग्स महेंद्रसिंग धोनीला स्वस्तात कायम ठेवू शकेल, असे बोलले जात होते.


या नियमानुसार पाच वर्षे निवृत्त झालेले खेळाडू अनकॅप्ड खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये खेळू शकतात. काही वृत्तांमध्ये असे म्हटले होते की, चेन्नईने हा नियम परत आणण्याची मागणी केली, जेणेकरून जास्त पैसे खर्च न करता धोनीला कायम ठेवता येईल. हा नियम आयपीएलच्या सुरुवातीला होता पण तो 2021मध्ये काढून टाकण्यात आला होता.


सीईओने दिला नकार 


आता चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी या प्रकरणी मोठी अपडेट दिली आहे. ही मागणी फ्रँचायझीने बोर्डासमोर केली नसल्याची त्यांनी स्पष्ट सांगितले. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विश्वनाथ म्हणाले की, "माझ्याकडे याबाबत कोणतीही माहिती नाही. आम्ही याबाबत कोणतीही मागणी केलेली नाही. बीसीसीआयनेच आम्हाला सांगितले होते की, आम्ही अनकॅप्ड खेळाडूंचा नियम राखू शकतो, बस्स. त्यांनी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. ”






करोडोंचा होणार फायदा


आयपीएलमधील पूर्वीच्या रिटेन्शन नियमानुसार, फ्रँचायझी अनकॅप्ड खेळाडूसाठी 4 कोटी रुपये देत होती. पण 2022 च्या लिलावापूर्वी हा नियम काढून टाकण्यात आला. कारण त्या वर्षी आयपीएलमध्ये दोन नवीन संघ जोडले गेले. त्यावर्षी चेन्नईने धोनीला 12 कोटी रुपयांना रिटेन केले होते. अनकॅप्ड खेळाडूंचा जुना नियम लागू केल्यास चेन्नईचे करोडो रुपये वाचू शकतात.


संबंधित बातमी :


Ishan Kishan : शतक ठोकलं तरी फायदा नाही...?; BCCI ने इशान किशनला दिला कडक शब्दात इशारा


MS Dhoni IPL 2025 : 'माही मार रहा है....'', पुन्हा ऐकू येणार हा आवाज! MS धोनीसाठी BCCI आयपीएलमध्ये आणणार नवीन नियम?