पॅरिस : परिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) महाराष्ट्रातील बीडचा अविनाश साबळे (Avinash Sable) तीन हजार मीटर स्टीपलचेसध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत आहे. अविनाश साबळे यानं तीन हजार मीटर स्टीपलचेस मध्ये सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेत पहिलं स्थान कायम ठेवलं. त्यानंतर योग्य नियोजन करत एनर्जी बाकी ठेवत अविनाश साबळेनं 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये अंतिम फेरीत धडक दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेस मध्ये अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.  


अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील असून तो सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये झालेल्या चुका बाजूला ठेवून अविनाश साबळे यानं सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. अविनाश साबळेनं सुरुवातीपासून नियोजनबद्ध रितीनं आपला खेळ केला. तीन हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीसाठी अविनाश साबळे पात्र ठरला आहे. अविनाश साबळेनं 8  मिनिट 15.40 सेकंदात पात्रता फेरी पूर्ण करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. 


उपांत्य फेरीत प्रवेश करुन चांगलं वाटलं. वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत ज्या चुका झाल्या होत्या त्या यावेळी टाळल्या. आता जी ऊर्जा राखून ठेवली आहे ती पुढील फेरीसाठी राखून ठेवायची आहे. गेल्या वर्षभरापासून पॅरिस ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करत आहे. अंतिम फेरीत पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार आहे. देशाला माझ्यावर गौरव वाटेल, अशी कामगिरी करणार आहे, असं अविनाश साबळे म्हणाला. 7 ऑगस्टला टोकियो ऑलिम्पिकमध्ये मध्ये भारताला एक पदक मिळालं होतं. आता थोडा आराम करुन पुढील फेरीत खेळणार आहे. 


नीरज चोप्रा त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल. त्याला पाहून अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळेल. नीरज चोप्रा देखील भारताला पदक मिळवून देईल, असा विश्वास अविनाश साबळेनं व्यक्त केला. 7  ऑगस्टला भारताला पुन्हा पदक मिळेल, असं अविनाश साबळे म्हणाला. अविनाश साबळे अंतिम फेरीच्या लढतीत खेळणार आहे. 


7  ऑगस्टला अंतिम फेरी


महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे हा ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला खेळाडू ठरला आहे. पात्रता फेरीत अविनास साबळे पाचव्या स्थानावर राहिला याबाबत बोलताना तो म्हणाला की यावेळी जी एनर्जी वाचवली आहे ती अंतिम फेरीत वापरणार आहे.


संबंधित बातम्या :


Nisha Dahiya : निशा दहिया आघाडीवर असताना जखमी झाली, अर्ध्या मिनिटात सर्व फसलं, मॅच संपताच धाय मोकलून रडली Video