Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Sharma:रोहित शर्माचा धमाका सुरुच, हिटमॅनचा षटकारांचा नवा विक्रम, ख्रिस गेलचं रेकॉर्ड संकटात
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये चार षटकार मारले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्मानं दुसऱ्या मॅचमध्ये 5 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं 64 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकदिवसीय सामन्यात 300 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 302 षटकार आहेत. दुसरीकडे रोहितच्या या धडाकेबाज फलंदाजीमुळं ख्रिस गेलचं रेकॉर्ड संकटात आलं आहे. ख्रिस गेलनं आतापर्यंत 280 मॅचमध्ये 328 षटकार मारले आहेत.
रोहित शर्मानं 177 मॅचमध्येच 300 षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे. ख्रिस गेल 328 षटकारांसह पहिल्या, रोहित शर्मा 302 षटकारांसह दुसऱ्या आणि सनथ जयसुर्या 263 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
रोहित शर्मानं 177 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 29 शतकं आणि 55 अर्धशतकं झळकावली आहेत. रोहितनं वनडेमध्ये एकूण 8801 धावा केल्या आहेत.