Novak Djokovic Arrested: सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच याला कोरोना लसीशी संबंधित खटला जिंकल्यानंतरही ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका वृतात देण्यात आलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिजा प्रकरण जिंकल्यानंतरही मेलबर्न पोलिसांनी जोकोविचला अटक केलीय, असं जोकोविचचे वडील सर्जन जोकोविच यांनी म्हटल्याचं सांगण्यात आलंय. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. 


ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जोकोविच बुधवारी मेलबर्न येथे दाखल झाला. मात्र, त्याला आठ तासांहून अधिक वेळ विमानतळावरच थांबवण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया सरकारनं परदेशी नागिरकांसाठी नवी नियमावली जाहीर केलीय. त्यानुसार, कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या परदेशी नागरिकांनाच ऑस्ट्रेलियात प्रवेशाची परवानगी आहे. लसीकरणाचा नियम न पाळल्याने ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द केला होता. त्यानंतर त्याला अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये नेले. 


जोकोविचला गेल्या चार दिवसांपासून स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं होतं. दरम्यान, जोकोविचचा व्हिजा स्वीकारण्यासाठी आणि ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत खेळण्यासाठी मेलबर्नच्या न्यायालयात आज व्हर्चुअल सुनावणी पार पडली. ही सुनावणी भारतीय वेळेनुसार आज पहाटे 4.30 वाजल्यापासून सुरू झाली होती. या सुनावणी दरम्यान न्यायाधीश अँथनी जोकोविचला मेलबर्नच्या क्वारंटाइन हॉटेलमधून बाहेर काढण्याचे आदेश दिले.


सरकारी वकील ख्रिस्तोफर ट्रॅन यांनी न्यायाधीशांना सांगितले की, "इमिग्रेशन, सिटीझनशिप, इमिग्रेशन सेवा आणि बहुसांस्कृतिक विभागाचे मंत्री अॅलेक्स हॉक हे व्हिसा रद्द करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक अधिकाराचा वापर करायचा की नाही? हे ठरवतील. यामुळं जोकोविचला पुन्हा हद्दपारीचा सामना करावा लागू शकतो. एवढेच नव्हे तर, जोकोविच 17 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून मुकण्याची शक्यता आहे."


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha