Omicron in India : भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग वेगाने पसरत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या 4033 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 1552 लोक या आजारातून बरे झाले आहेत. या आकडेवारीनुसार, सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 1216 ओमायक्रॉन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्याचवेळी, राजस्थानमध्ये दुसऱ्या क्रमांकावर रुग्णांची नोंद झाली आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत 529 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, दिल्लीतील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 513 झाली आहे. ओमायक्रॉन संसर्गाच्या बाबतीत दिल्ली तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.


ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्णसंख्या चार हजारांवर


महाराष्ट्रात 1216 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत 529 रुग्ण आढळले आहेत. तर, दिल्लीतील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 513 झाली आहे. याशिवाय कर्नाटकात 441, केरळमध्ये 333, गुजरातमध्ये 236, तामिळनाडूमध्ये 185, हरियाणामध्ये 123 आणि उत्तर प्रदेशमध्ये 100 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. 


देशभरात कोरोनाचे 1 लाख 79 हजार 729 नवे रुग्ण


एकीकडे ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंता वाढली आहे. यातच देशातील कोरोनाबाधितांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 79 हजार 729 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 146 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.


आतापर्यंत  3 कोटी 57 लाख 7 हजार 727 जणांना कोरोनाची लागण
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, नवीन आकडेवारीसह, देशातील एकूण कोरोनारुग्णांची संख्या आता 3 कोटी 57 लाख 7 हजार 727 झाली आहे. तर, या महामारीमुळे आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 4 लाख 83 हजार 936 वर गेली आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणानंतर आता सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाख 23 हजार 619 झाली आहे. मात्र, आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 172 लोक कोरोना महामारीतून बरे झाले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :



 


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha