Nitu Ganghas Wins Gold in Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. 48 किलो वजनी गटात नीतू घंघास हिने मंगोलियाच्या लुटसेखर अलतेंगसेंग हिचा पराभव करत गोल्ड पदकावर नाव कोरले. बॉक्सर नीतू घंघास हिने लुटसेखर अलतेंगसेंग हिचा 5-0 ने दारुण पराभव केला. याआधी शनिवारी नीतू घंघास हिने कझाकिस्तानच्या बॉक्सरचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती.
दिल्ली येथे सुरु असलेल्या वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत नीतू घंघास हिने आज भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. याशिवाय भारताला आणखी तीन महिला बॉक्सरकडून सुवर्णपदाची आपेक्षा आहे. यामध्ये स्विटी बूरा, निखत जरीन आणि लवलीना बोरहेगन या बॉक्सरचा समावेश आहे.
नीतू घंघास हिच्यानंतर भारतीय चाहत्यांच्या नजरा स्वीटी बूरा हिच्या सामन्याकडे आहे. स्वीटी बूरा वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिपच्या फायनलमध्ये पोहचली आहे. 81 किलो वजनी गटात तिचा आज सामना होणार आहे. स्वीटी बूराकडून चाहत्यांना आणखी एका पदकाची आपेक्षा आहे. त्याशिवाय रविवारी निखत जरीन आणि लवलीना बोरहेगन यांच्या सामन्याकडेही चाहत्यांच्या नजरा आहेत. या दोघींकडूनही भारतीयांना सुवर्णपदाची आपेक्षा आहे.
रविवारी दोन सुवर्णपदकाची शक्यता -
निखत जरीन आणि लवलीना बोरहेगन यांनीही वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. 26 मार्च रोजी या दोघी मैदानात उतरणार आहेत. या दोघींकडून भारतीयांना गोल्ड मेडलची आपेक्षा आहे. वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत भारताच्या चार महिला बॉक्सरने फायनलमध्ये प्रवेश केला. यामध्ये नीतू घंगास हिने सुवर्णपदक मिळवून दिले. तर आज रात्री स्वीटी बूराचा सामना आहे, तर 26 मार्च रविवारी निखत जरीन आणि लवलीना बोरहेगन रिंगमध्ये उतरणार आहेत. या तिन्ही सामन्याकडे भारतीय क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे.