Cm Eknath Shinde on Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी फक्त एक दिवस सेल्युलर तुरुंगात राहून यावं, असं आव्हान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. अंदमानातील सेल्युलर तुरुंगात सावरकरांना ( Damodar Savarkar) ठेवण्यात आलं होत. राहुल गांधी (Rahul Gandhi Latest News) यांची खासरदारकी रद्द झाल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे असं म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, ''सावरकरांचा ( Damodar Savarkar) वारंवार अपमान राहुल गांधी (Rahul Gandhi Latest News) यांनी केला आहे. आजही राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला. सावरकर ( Damodar Savarkar) हे फक्त महाराष्ट्र नाही, तर देशाचे दैवत आहेत. त्यांनी देशासाठी मरणयातना भोगल्या आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसल्या आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi Latest News) यांनी फक्त एक दिवस सेल्युलर तुरुंगात राहून यावं आणि त्यांना फक्त एक तास घाण्याला झुंपलं तर त्यांना त्या यातना कळतील. म्हणून याचा निषेध करावं तितकं कमी आहे.''


Cm Eknath Shinde on Rahul Gandhi: 'माफी मागायला मी सावरकर नाही', राहुल गांधींच्या वक्तव्यवर काय म्हणाले मुख्यमंत्री? 


खासदारकी रद्द झाल्यानंतर आज राहुल गांधी (Rahul Gandhi Latest News) यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ज्या भाषणामुळे त्यांना शिक्षा झाली त्याबद्दल माफी मागायला 'मी सावरकर नाही', असं ते म्हणाले आहेत. यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''राहुल गांधी (Rahul Gandhi Latest News) म्हणाले की माफी मागायला मी सावरकर नाही. तुम्ही सावरकरांना काय समजता? यांना याची शिक्षा मिळालीच पाहिजे.''    






Cm Eknath Shinde on Maha Vikas Aghadi: उत्तर ऐकण्याआधीच विरोधकांनी पळ काढला: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विरोधी पक्ष नेत्यांनी आज सभा त्याग केला. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत की, ''उत्तर ऐकण्याआधीच विरोधकांनी पळ काढला.'' ते म्हणाले, यावेळीच कामकाज हे विक्रमी आहे. यासाठी अध्यक्ष यांचं अभिनंदन.  


इतर महत्वाची बातमी: 


संजय राऊतांचा खुलासा समाधानकारक नाही, हक्कभंगाचा झाला इथंपर्यंत पोहचलो - नार्वेकर