Commonwealth Games 2022 : यंदा कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) इंग्लंडमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहेत. या भव्य स्पर्धेसाठी बॉक्सिंग खेळात भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि बॉक्सर निखत जरीन (Nikhat Zareen) यांनी स्थान मिळवलं आहे. त्यामुळे या दोघेही या स्पर्धेत भारताचं नेतृत्त्व करणार असून पदकासाठी प्रयत्नांची शिक्सत करताना दिसतील.
भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) पायाला दुखापत झाल्यामुळे शुक्रवारी (10 जून) 48 किलो कॅटेगरीसाठीच्या ट्रायल्समधून माघार घेतली. ज्यानंतर आता लवलिना आणि निखतची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी पात्रता सामन्यांत निखतने 50 किलो वजनी गटात हरयाणाच्या मिनाक्षीला 7-0 ने मात देत विजय मिळवला. तर दुसरीकडे लवलिनाने रेल्वेकडून खेळणाऱ्या पुजाविरुद्ध दमदार विजय मिळवत कॉमनवेल्थ गेम्सचं तिकीट मिळवलं.
दुखापतीमुळे मेरीची माघार
मागील वेळी कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2018) सुवर्णपदक विजेत्या मेरीने ऐतिहासिक कामिगिरी केली होती. पण यंदा या 39 वर्षीय बॉक्सर मेरी यंदा मात्र स्पर्धेआधी ट्रायलच्या सामन्यातच जबर दुखापतग्रस्त झाली, ज्यामुळे तिला सामनाही पूर्ण करता आला नाही. विशेष म्हणजे कॉमनवेल्थ गेम्ससाठी मेरीने विश्व चॅम्पियनशिप आणि आशिया खेळातूनही माघार घेतली होती. मेरी कोमच्या माघार घेण्यामुळे आता हरियाणाची नीतू हिने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये कॉमनवेल्थ गेम्ससाठी होणाऱ्या ट्रायलच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
भारतीय खेळाडू कॉमनवेल्थही सर करणार का?
भारतीय बॅडमिंटन संघाने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या थॉमस कपल्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाला मात देत 73 वर्षात पहिल्यांदाच थॉमस कप जिंकला. यावेळी लक्ष्य सेन आणि किंदम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत विजय मिळवला. तर सात्त्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीत विजय मिळवत, 5 पैकी 3 सामने जिंकत कप मिळवला. त्याआधी मागील वर्षी पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक्स (tokyo olympics 2021) स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली. आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी भारतीय खेळाडूंनी करत 7 पदकं खिशात घातली. विशेष म्हणजे भालाफेकपटू नीरज चोप्राने यावेळी सुवर्णपदक जिंकलं. तर वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य, पैलवान रवी दहियाने रौप्य, पैलवान बजरंग पुनियाने कांस्य पदक जिंकल. याशिवाय महिला बॉक्सर लवलिनाने कांस्य आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदक जिंकल. भारतीय हॉकी संघानेही कांस्य पदकावर यंदा नाव कोरलं. दरम्यान भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील ही कामगिरी पाहता यंदा कॉमनवेल्थ गेम्सममध्येही भारत दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्ससाठी 'या' भारतीय महिला कुस्तीपटूंची निवड, इंग्लंडमध्ये रंगणार स्पर्धा
- Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारताला मोठा झटका, दिग्गज बॉक्सर मेरी कोमची माघार
- IND vs SA: 'मिलर'ची 'किलर' कामगिरी! 'इतक्या' वेळा जिंकलाय सामनावीराचा पुरस्कार, एबी डिविलियर्सलाही टाकलं मागं