Schools Starts : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरु होणार आहेत. पहिली ते दहावीच्या शाळा आजपासून सुरु होतील. शाळा जरी 13 जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटलं होतं.
आजपासून प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर ऑफलाईन शाळा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या (Online education) माध्यमातून शिक्षण देण्यात येत होतं. कोरोना (Corona) आणि त्यानंतर लॉकडाऊन (Corona Lockdown) यांचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग (Online School) भरवण्यात आले. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहावं लागलं. सध्या राज्यात सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.
15 जून रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत बोलावलं
शाळा जरी 13 जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं आदेशात म्हटलं होतं. 13 आणि 14 जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात उद्बोधन करायचं आहे, असं आदेशात म्हटलंय. शाळेत येणारे विद्यार्थी तसेच पालकांचं कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगानं प्रबोधन करावं असं देखील आदेशात म्हटलंय. राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून निर्देश जारी करण्यात आले. आदेशात शैक्षणिक सत्र 2022 - 23 सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आलेत. शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार, राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र 13 जून पासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू होणार असल्याचं या निर्देशात म्हटलं आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी 15 जूनपासून तर विदर्भातील विद्यार्थ्यांनी 27 जूनपासून प्रत्यक्षात शाळेत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ट
विदर्भातील शाळा 27 जूनपासून
आजपासून प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु होणार आहेत. दरम्यान, राज्यातील शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर होता. मात्र शिक्षण विभागानं यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली. शिक्षण आयुक्तांनी पत्रक काढत विदर्भ वगळता राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. विदर्भात मात्र शाळा 27 जूनपासून सुरू होणार आहेत. तर विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं आदेशात म्हटलं होतं.