CWG 2022: बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात (CWG 2022) भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. या स्पर्धेत भारतानं 22 सुवर्णपदक, 16 रौप्यपदक आणि 23 कांस्यपदकांसह एकूण 61 पदकं जिकली आहेत. दरम्यान, कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या सोहळ्यास कुस्ती, वेटलिफ्टिंगह बॉक्सिंग, क्रिकेट, बॅडमिंटन आणि टेबल टेनिसपटू उपस्थित होते. यावेळी भारताची बॉक्सर निखत झरीननं (Nikhat Zareen) मोंदीना खास भेट दिलीय. 


वर्ल्ड चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेता स्टार बॉक्सर निकतनं नुकतीच पार पडलेल्या बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. "माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर यांना सर्व बॉक्सर्सनी स्वाक्षरी केलेलं बॉक्सिंग 'ग्लोव्हज' भेट  दिली. या अद्भुत संधीबद्दल धन्यवाद.देशाला अभिमान वाटणाऱ्या माझ्या सहकारी खेळाडूंसोबत चांगले दिवस घालवले, असं निखत झरीनं ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय.


निखत झरीनचं ट्वीट-



कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी पदकं जिकलेले खेळाडू-


सुवर्णपदक - 22: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना (पीपी), नीतू घणघस, अमित पंघल, एल्डहॉस पॉल, निखत झरीन, शरत कमल-श्रीजा अकुला, पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक-चिराग, शरथ कमल.


रौप्यपदक - 16: संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरत-साथियान, भारतीय महिला क्रिकेट संघ, सागर, पुरुष हॉकी संघ. 


कांस्यपदक - 23: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला संघ, संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव, घोषाल-दीपिका, श्रीकांन किदाम्बी, त्रिशा- गायत्री, साथियान.



हे देखील वाचा-