एक्स्प्लोर

रॉस टेलर-लॅथमची अभेद्य भागीदारी, न्यूझीलंडचा 6 विकेटने विजय

टॉम लॅथम आणि रॉस टेलरने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 200 धावांच्या भागीदारीने न्यूझीलंडच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

मुंबई : न्यूझीलंडने मुंबईच्या पहिल्या वन डेत भारताचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पराभवामुळे वन डे सामन्यांच्या क्रमवारीत पुन्हा नंबर वन होण्याची टीम इंडियाची संधी हुकली. कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या शतकाला यशाचा टिळाही लागू शकला नाही. टॉम लॅथम आणि रॉस टेलरने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 200 धावांच्या भागीदारीने न्यूझीलंडच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. या सामन्यात न्यूझीलंडचे पहिले तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. पण लॅथमने नाबाद 103 धावांची खेळी उभारून न्यूझीलंडच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. रॉस टेलरचं शतक पाच धावांनी हुकलं. त्याने 95 धावांची खेळी करून लॅथमला साथ दिली. विराट वन डेत सर्वाधिक शतकवीरांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डेत शतक झळकावून वन डे सामन्यांचं द्विशतकही साजरं केलं. विराट हा कारकीर्दीतल्या दोनशेव्या वन डेत शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हलियर्सने हा पराक्रम गाजवला होता. विराटने डिव्हिलियर्सच्या पावलावर पाऊल टाकून कारकीर्दीतलं एकतिसावं शतक झळकावलं. त्यामुळे वन डे सामन्यांच्या इतिहासात सर्वाधिक शतकं फटकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला. विराटनं रिकी पॉन्टिंगचा तीस शतकांचा विक्रम मोडीत काढला. सर्वाधिक वन डे शतकांच्या शर्यतीत सचिन तेंडुलकर आणि विराट हे दोन भारतीय फलंदाज पहिल्या दोन स्थानावर आहेत. सचिन तेंडुलकरने वन डे कारकीर्दीत 49 शतकं झळकावली आहेत. सचिनच्या या विक्रमापासून विराट आता 18 शतकं दूर आहे. विशेष म्हणजे विराट वन डेच्या आतापर्यंत 192 इनिंग खेळला आहे. यामध्येच त्याने 31 शतकं पूर्ण केली. सचिनचे पहिल्या 186 इनिंगमध्ये 16, तर पाँटिंगचे पहिल्या 186 इनिंगमध्ये 15 शतकं होते. म्हणजेच विराटने या दिग्गजांच्या दुप्पट वेगाने शतकं पूर्ण केली आहेत.

संबंधित बातमी : 200 वन डे, 31 शतकं, विराटने पॉन्टिंगला मागे टाकलं

महत्त्वाच्या बातम्या

Eng vs IND 4th T20 : श्रेया मोठा गेम झाला रे... ना वैभव, ना अभिषेक, ना कोणता गोलंदाज चालला! आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडनेही टीम इंडियाची अब्रू काढली, कर्णधार अय्यरने सलग दुसरी मालिका गमावली
श्रेया मोठा गेम झाला रे... ना वैभव, ना अभिषेक, ना कोणता गोलंदाज चालला! आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडनेही टीम इंडियाची अब्रू काढली, कर्णधार अय्यरने सलग दुसरी मालिका गमावली
England vs India 4th T20 Live : श्रेयस अय्यरने टॉस जिंकताच घेतला धाडसी निर्णय! टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये 2 मोठे बद्दल; कोण IN, कोण OUT?
श्रेयस अय्यरने टॉस जिंकताच घेतला धाडसी निर्णय! टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये 2 मोठे बद्दल; कोण IN, कोण OUT?
टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ! 20 षटकात 417 धावा, 47 षटकार...; एका फलंदाजाने 55 चेंडूंमध्ये ठोकल्या 206 धावा
टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ! 20 षटकात 417 धावा, 47 षटकार...; एका फलंदाजाने 55 चेंडूंमध्ये ठोकल्या 206 धावा
IND vs SL U19 3rd Youth ODI : टीम इंडियाने आणखी एक मालिका गमावली! निर्णायक सामन्यात द्रविडच्या मुलाला डच्चू, श्रीलंकेने 1 विकेट राखून जिंकला सामना
टीम इंडियाने आणखी एक मालिका गमावली! निर्णायक सामन्यात द्रविडच्या मुलाला डच्चू, श्रीलंकेने 1 विकेट राखून जिंकला सामना

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget