Neeraj Chopra Gold Medal: नीरज चोप्राने (Neeraj Chopra) ॲथलेटिक्स फेडरेशन कप 2024 मध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारताचा झेंडा फडकवला आहे. 3 वर्षात पहिल्यांदाच नीरज चोप्रा एखाद्या देशांतर्गत स्पर्धेत सहभागी झाला होता. (Neeraj Chopra wins gold medal)


भुवनेश्वरमध्ये झालेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राचा सर्वोत्तम थ्रो 82.27 मीटर होता.  काही दिवसांपूर्वीच त्याने दोहा डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकले होते. तेथे त्याने 88.36 मीटरवर भालाफेक करून ऑलिम्पिकच्या तयारीला सुरुवात केली. फेडरेशन चषकाबद्दल बोलायचे झाले तर, नीरजने डीपी मनूला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले, ज्याचा सर्वोत्तम थ्रो 82.06 मीटर होता.


तिसऱ्या फेरीपर्यंत नीरज चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर होता. तिसऱ्या फेरीनंतर नीरजचा सर्वोत्तम थ्रो 82 मीटर होता, पण डीपी मनूची सर्वोत्तम थ्रो 82.06 मीटर होता. त्यानंतर चौथ्या थ्रोमध्ये नीरज चोप्राने 82.27 मीटरचा थ्रो फेकला, जे मनूला शेवटपर्यंत पार करता आले नाही. डीपी मनूने रौप्यपदक जिंकले आणि उत्तम पाटील तिसऱ्या स्थानावर राहिला, ज्याने 78.39 मीटर फेक करून कांस्यपदक जिंकले. किशोर जेना, देखील भारतातील प्रसिद्ध भालाफेकपटूंपैकी एक आहे, मात्र त्याचा सर्वोत्तम थ्रो केवळ 75.49 मीटर होता.






नीरज चोप्राला मिळाला थेट अंतिम फेरीत प्रवेश


नीरज चोप्रा आणि डीपी मनू यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक वेळा 75 मीटरचा टप्पा पार केला आहे. या कारणास्तव, भारतीय ॲथलेटिक्सचे प्रमुख राधाकृष्णन नायर म्हणाले होते की 75 मीटरचा टप्पा ओलांडणाऱ्या खेळाडूंना पात्रता फेरीचा भाग घेण्याची आवश्यकता नाही. याच कारणामुळे नीरज चोप्रा अंतिम फेरीत थेट खेळताना दिसला. दुसरीकडे, ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी, डीपीमानुला 85.5 मीटरचा टप्पा ओलांडायचा होता, परंतु तो त्यात अपयशी ठरला आहे. 


नीरज चोप्राचा सर्वोत्तम थ्रो किती मीटरचा आहे?


नीरज चोप्रा मात्र फेडरेशन कपमध्ये आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसला नाही. पण जर आपण त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रोबद्दल बोललो तर तो 82.27 मीटरपेक्षा खूपच चांगला आहे. त्याने जून 2022 मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर अंतर कापून वैयक्तिक सर्वोत्तम आणि राष्ट्रीय विक्रमही केला.


इतर बातम्या:


ICC T-20 World Cup 2024: दोनदा टोलावले 6 चेंडूत 6 षटकार; 9 चेंडूत अर्धशतक; टी-20 विश्वचषकात या खेळाडूवर असेल सर्वांचं लक्ष!


किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?


आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार