National Sports Day 2022 : आज 29 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day 2022). खरंतर खेळ हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक असतो. राष्ट्रीय क्रीडा दिन हा विविध देशांमध्ये राष्ट्रीय क्रीडा संघ आणि त्या देशांच्या क्रीडा परंपरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो. 1928, 1932 आणि 1936 मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांच्या जयंती निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. हे भारतीय आणि जागतिक हॉकीमधील एक महान व्यक्तिमत्त्व होते.


29 ऑगस्ट आणि राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) :


हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी करण्यात येते. हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्डन कामगिरी (1928, 1932 आणि 1936) नोंदवली आहे. अनेक दशकानंतही त्यांची जादू कायम आहे. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि व्यक्तिमत्व आहे. सरकारने 1956 मध्ये ध्यानचंद यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या दिवशी शैक्षणिक आणि सार्वजनिक संस्थांमध्ये खेळांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी या दिवशी क्रीडा कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी राष्ट्रपती भारताच्या राष्ट्रपती भवनात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासह प्रमुख क्रीडा संबंधित पुरस्कार प्रदान करतात. 


बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीसंघाचे नेतृत्व


हॉकीतील लक्षवेधी कामगिरीनंतर ध्यानचंद यांना 1927 मध्ये 'लांन्स नायक' पदावर बढती देण्यात आली. 1932 मध्ये नायक आणि 1936 मध्ये सुभेदार असे प्रमोशन त्यांना मिळत गेले. मैदानातील सातत्यपूर्ण कामगिरीसोबत त्यांची बढती होत राहिली. लेफ्टनंट, कॅप्टन आणि मेजर या पदापर्यंत त्यांनी मजल मारली. मेजर ध्यानचंद यांच्यातील कौशल्याबाबत बोलताना स्टिकला चेंडू जणू चिटकलेला असायचा असे वर्णनही ऐकायला मिळते. मेजर ध्यानचंद यांनी 1936 मध्ये बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केल होते.


महत्वाच्या बातम्या :