National Games 2022 : भारतीय वेटलिफ्टर्सने यंदांच्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) कमाल कामगिरी केली. यावेळी ऑलिम्पिक पदकविजेत्या मीराबाई चानूने (Mirabai Chanu) हीने सुवर्ण पदक (Mirabai Wins Gold medal) जिंकलं होतं. सध्या सुरु नॅशनल गेम्समध्येही (National Games 2022) मीराबाईनं आपली कमाल कायम ठेवत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
मीराबाई हिने नॅशनल गेम्समध्ये महिलांच्य़ा 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं आहे. मीराबाईने एकूण 191 किलो वजन उचलत ही कमाल केली आहे. यावेळी तिने स्नॅच राऊंडमध्ये 84 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 107 किलो वजन उचललं. विशेष म्हणजे तिने सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केल्याने क्लिन अँड जर्कमध्ये तिला तिसरा अटेम्प्ट करावा लागला नाही. ती आधीच आघाडीवर असल्याने तिने सुवर्णपदक जिंकलं आहे. यावेळी संजिताने रौप्यपदक तर ओडिशाच्या स्नेहा सोरेनने कांस्य पदक मिळवलं.
मीराबाईचा एकहाती विजय
सर्वात आधी मीराबाईने स्नॅच राऊंडमध्ये पहिल्याच प्रयत्नात 81 किलो वजन उचलत आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने 84 किलो वजन उचलत आपली आघाडी वाढवली. त्यानंतर तिला स्नॅच राऊंडमधील तिसरा प्रयत्न करावा लागला नाही, कारण ती इतर खेळाडूंच्या तुलनेत 3 किलोने आघाडीवर होती. त्यानंतर क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये मीराबाईन पहिल्या प्रयत्नात 103 किलो वजन उचललं. त्यानंतर संजिताने तिच्या तिसऱ्या प्रयत्नात 105 किलो वजन उचलत मीराबाईला तगडी टक्कर दिली. पण मीरााईने दुसऱ्याच प्रयत्नात 107 किलो वजन उचलत पुन्हा एकदा आघाडी घेतली. ती इतरांच्या तुलनेत आघाडीवर असल्याने तिला तिसरा प्रयत्न करावा लागला नाही.
हे देखील वाचा-
- National Games 2022 : महाराष्ट्राचं सुवर्णपदकाचं खातं उघडलं, पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफलमध्ये नेमबाज रुद्रांक्ष पाटीलचा सुवर्णवेध
- Jasprit Bumrah: मोहम्मद शामी, दीपक चाहर की अन्य कोण? टी-20 विश्वचषकात 'हे' गोलंदाज घेऊ शकतात बुमराहची जागा