एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीची तारीख निश्चित!
जस्टिस लोढा समितीच्या शिफारशीनुसार एमसीएने अजूनही आपल्या घटनेत बदल केलेला नाही. त्यामुळे सध्या तरी व्यवस्थापन समितीतल्या कोणत्या आणि किती जागांसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय झालेला नाही.
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीएची आगामी द्वैवार्षिक निवडणूक 10 नोव्हेंबरला घेण्याचा निर्णय एमसीएच्या व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
जस्टिस लोढा समितीच्या शिफारशीनुसार एमसीएने अजूनही आपल्या घटनेत बदल केलेला नाही. त्यामुळे सध्या तरी व्यवस्थापन समितीतल्या कोणत्या आणि किती जागांसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय झालेला नाही.
पण या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून 19 सप्टेंबरच्या सुनावणीत अंतिम आदेश येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या त्या आदेशानुसारच एमसीएच्या व्यवस्थापन समितीची निवडणूक होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आधी एमसीएची निवडणूक 2015 मध्ये घेण्यात आली होती. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
लोढा समितीच्या शिफारशींनुसार क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं वय 70 वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये. तसंच एका पदाधिकाऱ्याला दोन टर्मपेक्षा जास्त कालावधीसाठी पदाधिकारी होता येणार नाही. यानंतर शरद पवारांनी डिसेंबर 2017 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर आशिष शेलार यांच्याकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement