नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सुरक्षेच्या दृष्टीने सरकारकडून सुरक्षेची मागणी केली आहे. काही वृत्तांनुसार, मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी पत्नी हसीन जहाँकडून मिळत असल्याचा आरोप त्याने केल्याचं बोललं जात आहे.
मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात अनेक महिन्यांपासून वाद आहे. हसीन जहाँने शमीवर अनैतिक संबंधांचा आरोप करत कौटुंबीक हिंसाचाराचेही आरोप केले आहेत. तिने शमीविरोधात कोलकात्यामधील अलीपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दिली होती.
शमीवर त्याच्या पत्नीने मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले होते, ज्यामुळे बीसीसीआयने आपल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून शमीचं नावही वगळलं होतं. पण नंतर चौकशीत हे आरोप निराधार असल्याचं सिद्ध झाल्यानंतर शमीचं नाव पुन्हा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये घेण्यात आलं.
नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत मोहम्मद शमीने महत्त्वाची भूमिका निभावली. या दौऱ्यात त्याने एकूण 16 विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध 4 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही शमीची निवड करण्यात आली आहे.
शमीला जीवे मारण्याची धमकी, सरकारकडे सुरक्षेची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Oct 2018 08:57 AM (IST)
ही धमकी पत्नी हसीन जहाँकडून मिळत असल्याचा आरोप त्याने केल्याचं बोललं जात आहे. यानंतर त्याने राज्य सरकारकडून सुरक्षारक्षकांची मागणी केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -