Mohammed Shami : टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये कांगारुंचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनमध्ये घडक मारलीये. फायनलमध्ये न्यूझीलंडला नमवल्यास टीम इंडियाकडे 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी घरी आणण्याची संधी असणार आहे. आज (दि. 9) दुपारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत फायनल गाठण्याची दिमाखदार कामगिरी केली आहे. 


या एन्ट्रीत राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतलेल्या मोहम्मद शमीचे मोलाचे योगदान आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत ज्या टीम इंडियाची गोलंदाजी कमकुवत वाटत होती, त्याच टीम इंडियामध्ये 'ब्रह्मास्त्र' सुद्धा आहे याची जाणीव चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रत्येक सामन्यात झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यामध्ये मोहम्मद शमीला रोजा वादाला सामोरं जाव लागलंय. दरम्यान, ज्या गांगुलीनं टीम इंडियाला लढण्याची हिंमत दिली त्याच गांगुलीनं टीम इंडियाला सेहवाग, युवराज आणि कैफसारखे हिरो दिले, तसंच शमीच्या रुपातील स्मशानातील सोनं शोधण्याचं काम सुद्धा गांगुलीनं केलं आहे.


कब्रस्तान ते वर्ल्डकप किंग होण्यापर्यंतच्या प्रवासात शमीच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अनेक वादळ आलेली पाहायला मिळाली आहे.. मोहम्मद शमीवर पत्नीकडून गंभीर आरोपही करण्यात आले. न्यायालयीन लढाई सुद्धा झाली, पण न डगमगता पाय रोवून शमीने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं. 


दहावीपर्यंत शिक्षण 


मोहम्मद शमीने वयाच्या 15 वर्षापासून क्रिकेट अकादमीत जाण्यास सुरुवात केली होती. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून मुरादाबादमध्ये त्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, पण तो जाऊ शकला नाही. दरम्यान यावेळी त्याच्या वडिलांनी सुद्धा या निर्णयाला साथ दिली होती. वडिलांना सुद्धा वाटत होते एक दिवस शमी टीम इंडियासाठी गोलंदाजी करेल. शमी ज्या गावातून पुढे आला आहे तिथं आजही आठ तास वीज नसते. आई वडिलांना त्रास होऊ नये, म्हणून आता इनव्हर्टरची सोय केली आहे.  


मोहम्मद शमी कब्रस्तानात सराव करायचा


मोहम्मद शमीच्या कारकिर्दीत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यांचा मोठा वाटा आहे. ज्याचा उल्लेख खुद्द मोहम्मद शमीने अनेकदा केलेला पाहायला मिळालाय. सौरभ गांगुली यांनीही अनेक प्रसंगी मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. रोहितला कॅप्टन होतोस की नाही की मी जाहीर करून टाकू? असे दरडावतच कॅप्टनसी घेण्यास सांगितले होते. आज रोहित टीम इंडियासाठी काय योगदान देत आहे हे आपण पाहत आहोत. त्यामुळे शमीची गुणवत्ता हेरण्यास गांगुली यांना फारसा वेळ लागला नव्हता.


मोहम्मद शमी हा उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील सहसपूर अलीनगर गावातून येतो. त्याचे वडील शेतकरी होते. शमीला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. शमीला जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा तो गोलंदाजी करायचा. मोहम्मद शमीच्या घराच्या मागे एक स्मशानभूमी आहे, जिथे तो सराव करायचा. मोहम्मद शमीकडे लेदर  बॉल घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते, तो टेनिस बॉलने सराव करायचा.


जेव्हा मोहम्मद शमी बंगालमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी पोहोचला 


मोहम्मद शमीने लेदर बॉलने गोलंदाजी करायला सुरुवात केली तेव्हा त्याचे प्रशिक्षक बदर अहमद यांनी त्याला खूप साथ दिली होती. स्थानिक स्पर्धेत शमीच्या गोलंदाजीसमोर कोणीही टिकू शकले नव्हते, पण तरीही उत्तर प्रदेशच्या ज्युनियर राज्य संघात शमीची निवड झाली नव्हती. त्यानंतर त्याचे प्रशिक्षक बदर अहमद यांनी त्याला कोलकात्यात क्लब क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शमीने शेवटचा प्रयत्न केला आणि प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार बंगाल क्रिकेटमध्ये नशीब आजमावण्यासाठी पश्चिम बंगालला पोहोचला.


मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची सौरव गांगुलीला भुरळ 


त्यावेळी युवा गोलंदाज मोहम्मद शमीलाही या निर्णयाचा फायदा झाला. त्याच्या प्रयत्नांची अन् मेहनतीची कोलकातामध्ये प्रशंसा झाली आणि तो त्वरीत ज्युनियर रँकमधून वर आला आणि बंगाल रणजी ट्रॉफी संघात बोलावण्याची चर्चा सुरु झाली. मोहम्मद शमीला प्रशिक्षण शिबिरात बोलावण्यात आले. तेथून बंगाल संघातील वरिष्ठ क्रिकेटपटूंना नेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने दिग्गज खेळाडू सौरव गांगुलीसाठी गोलंदाजी करत आपले लक्ष वेधून घेतले. सौरव गांगुलीची त्यावेळी नेहमीच टॅलेंटवर नजर राहिली. नेटमध्ये तरुण शमीच्या वेगवान माऱ्याचा सामना केल्यानंतर सौरव गांगुलीने ताबडतोब व्यवस्थापन संघाला शमीची विशेष काळजी घेण्यास आणि त्याच्या खेळासाठी त्याला पाठिंबा देण्यास सांगितले.


गांगुलीच्या पाठिंब्याने शमी सुसाट


सौरभ गांगुली यांनी त्यावेळी प्रतिभा हेरल्यानंतर मोहम्मद शमीने आपल्या खेळात आणखी सुधारणा केली. त्याचा बंगालला येण्याचा निर्णय यशस्वी झाला आणि बंगाल कॅम्पमध्ये नियमित सुद्धा झाला. हळूहळू त्याचे गांगुलीशी खास नाते निर्माण झाले. गांगुलीने शमीला आपल्या पंखाखाली घेत क्रिकेटपटू म्हणून त्याचे पालनपोषण केले. शमीला अनुभवी वेगवान गोलंदाज बनवण्यात गांगुलीच्या प्रभावाचा मोठा वाटा आहे.


मोहम्मद शमीच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक वादळं 


मोहम्मद शमीचा हसीन जहाँशी विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर चार वर्षात वैवाहिक आयुष्यात वादळ आले. 2018 मध्ये पत्नी हसीन जहाँने अनेक गंभीर आरोप केल्याने शमी व्यक्तीगत आयुष्यात उद्ध्वस्त होऊन गेला होता. त्याच्या डोक्यात आत्महत्येचाही विचार येऊन गेला होता. मात्र, त्याने कुटुंब नसतं तर कदाचित भयंकर आणि विपरित होऊन गेलं असतं, असंही त्यानं म्हटलं होतं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


आयपीएल खेळण्यासाठी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची देश सोडण्याची तयारी, इंग्लंडचं नागरिकत्व घेणार?