Mohammad Amir : पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद आमिरने आयपीएलबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची इच्छा असल्याचं आमिरने म्हटलं आहे. एका रिपोर्टनुसार, मोहम्मद आमिरला 2026 पर्यंत आयपीएलमध्ये खेळण्याची आशा आहे. पाकिस्तान सोडून इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व मिळविण्यासाठी आमिर प्रयत्नशील आहे.

पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएल खेळण्यास बंदी 

आमिर हा पाकिस्तानचा घातक गोलंदाज आहे. त्याने संघासाठी कायम दमदार कामगिरी केली आहे. पण आता त्याला आयपीएलमध्ये खेळायचे आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमधून बंदी घातली आहे.आयपीएलमधील फिक्सिंग प्रकरणानंतर हे पाऊल उचलण्यात आले होते. 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या बातमीनुसार,  आमिर म्हणाला, 'मला पुढील वर्षी आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते, असे झाले तर मी आयपीएलमध्ये खेळेन.

आमिरची पत्नी इंग्लंडची नागरिक 

वास्तविक मोहम्मद आमिरची पत्नी नर्जिस ही ब्रिटनची नागरिक आहे. मोहम्मद आमिरनेही यूकेच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. त्यांना नागरिकत्व मिळाल्यास ते पाकिस्तान सोडतील. अशा परिस्थितीत ते नियमानुसार आयपीएलमध्ये खेळू शकतात. आमिर म्हणाला, पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएलमधून बंदी आहे. पण आमचे माजी क्रिकेटपटू आयपीएलमध्ये कॉमेंट्री करतात.

मोहम्मद आमिरची पाकिस्तानसाठी दमदार कामगिरी 

मोहम्मद आमिरने आत्तापर्यंत पाकिस्तानसाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.  त्याने पाकिस्तानकडून 62 टी-20 सामने खेळले असून 71 विकेट्स पटकावल्या आहेत. याशिवाय त्याने 61 एकदिवसीय सामन्यात 81 विकेट घेतल्या आहेत. आमिरने 36 कसोटी सामनेही खेळले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 118 विकेट्स घेतल्या आहेत. आमिरनेही कसोटीत 751 धावा करत फलंदाजी करतानाही योगदान दिले आहे. आमिरने पाकिस्तान प्रीमियर लीगमध्येही चांगली कामगिरी केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

IND vs NZ Final : 'सामना संपल्यानंतरच समजेल...' चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती? उपकर्णधार गिलने केला खुलासा

IND vs NZ Final Dream11 : विराट कोहली, रचिन रवींद्रला कर्णधार करा, भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यात Dream11 मध्ये 'या' 11 खेळाडूंना द्या संधी, करोडपती व्हाल