एक्स्प्लोर

IPL 2020, MIvsRR :मुंबई इंडियन्सचा विजयाचा चौकार, मुंबईकडून राजस्थानचा 57 धावांनी पराभव

मुंबईनं राजस्थानला 194 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मुंबईच्या अचूक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव 19.1 षटकात 136 धावात आटोपला.

IPL 2020, MIvsRR | अबुधाबीच्या मैदानात मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईनं राजस्थानला 194 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मुंबईच्या अचूक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव 19.1 षटकात 136 धावात आटोपला. राजस्थानच्या जोस बटलरनं 70 धावांची खेळी करुन एकाकी झुंज दिली. मुंबईकडून जसप्रीत बुमरानं 20 धावात 4 फलंदाजांना माघारी धाडलं. तर ट्रेन्ट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सननं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा सहा सामन्यातला चौथा विजय ठरला. तर राजस्थानला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. सूर्यकुमार यादवच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्ससमोर 194 धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 193 धावांचा डोंगर उभारला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवनं 47 चेंडूत नाबाद 79 धावांची खेळी केली. त्यात 11 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमारचं यंदाच्या मोसमातलं हे पहिलच अर्धशतक ठरलं. याशिवाय कर्णधार रोहित शर्मानं 35 तर हार्दिक पंड्यानं नाबाद 30 धावा फटकावल्या.

कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक यांनी मुंबई इंडियन्सला शानदार सुरुवात करुन दिली. या दोघांनीही पहिल्या विकेटसाठी  4.5 षटकांत 49 धावांची भागिदारी केली. डिकॉकने 15 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह 23 धावा केल्या. आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या कार्तिक त्यागीने त्याला बाद केले. त्यानंतर लेगस्पिनर श्रेयस गोपाळने दोन चेंडूंमध्ये सलग दोन विकेट घेतल्या. प्रथम त्याने रोहित शर्माची विकेट घेतली आणि त्यानंतर ईशान किशनला माघारी धाडलं. मुंबईचा डाव तीन बाद 88 धाव होता. परंतु तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने एक बाजू राखून मैदानात सर्वत्र फटकेबाजी केली. सूर्यकुमारने 47 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या. त्याच्या अर्धशतकी खेळीत त्याने 11 चौकार आणि दोन षटकार ठोकले.

या विजयासह मुंबई इंडियन्सने पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. मुंबईचे सहा पैकी चार सामने जिंकत आठ गुण आहेत. तर राजस्थान रॉयल्स सातव्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
IND vs SL 1st Test : लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी
लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी
IND vs SL 1st Test DAY-5 : गॉलमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय; श्रीलंकेला धूळ चारत मालिकेत घेतली आघाडी
गॉलमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय; श्रीलंकेला धूळ चारत मालिकेत घेतली आघाडी
Eng Vs Pak 1st Test : पाकिस्तानचा संघ बकवास, इंग्लंड 3-0 जिंकणार...; मालिका सुरू होण्याआधीच स्टुअर्ट ब्रॉडची भविष्यवाणी, संपूर्ण पाक टीमची लायकी काढली, नको नको ते बोलला
पाकिस्तानचा संघ बकवास, इंग्लंड 3-0 जिंकणार...; मालिका सुरू होण्याआधीच स्टुअर्ट ब्रॉडची भविष्यवाणी, संपूर्ण पाक टीमची लायकी काढली, नको नको ते बोलला

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Embed widget