MI vs RCB, IPL 2021 1st Innings Highlights: कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनची सुरुवात शुक्रवारी झाली. सलामीच्या सामन्यात मुंबईचं बंगलोरसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं 9 विकेट्स गमावत 159 धावा केल्या आहेत. मुंबईकडून सलामीवीर ख्रिस लीननं सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तर सुर्यकुमार यादव, ईशान किशन यांच्या उपयुक्त खेळीमुळं संघाची धावसंख्या पर्यंत पोहोचली. मुंबई इंडियन्सची सुरुवात संथ गतीनं झाली. कर्णधार रोहित शर्मानं चांगली सुरुवात केली मात्र 19 धावांवर तो धावबाद झाला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं शानदार 31 धावांची खेळी केली. 


ख्रिस लीनचं अर्धशतक एका धावेनं हुकलं. त्याला वॉशिंग्टननं 49 धावांवर बाद केलं. त्यानंतर ईशान किशननं 19 चेंडूत 28 धावा केल्या. तर हार्दिक पांड्या 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला क्रुणाल पांड्यानं क्रुणालनं 07 धावा केल्या. तर पोलार्डनं 07 धावा केल्या. 


बंगळुरुकडून हर्षल पटेलनं शानदान गोलंदाजी केली. त्यानं 5 विकेट्स घेतल्या. दोन तर जॅमिसन आणि वॉशिंग्टन सुंदरनं 1-1 विकेट घेतली.